रस्त्यात अडवलं मोबाईल पैसे लुटले,माळेगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं
आय मिरर
बारामती तालुक्यातील माळेगाव पोलिसांनी रस्त्यात प्रवाशांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या दोघांना गजाआड केलं आहे.अक्षय चंद्रकांत जाधव आणि मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे अशी दोघांची नावे असून त्यांनी पिंगळेवस्ती शिरष्णे येथील भिमराव रामचंद्र पिंगळे यांना रस्त्यात अडवून मारहाण करीत त्यांचा मोबाईल आणि रोख रक्कम लुटली होती.
माळेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती परीसरात वाढलेले चोरीचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी माळेगांव पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने व पोलीस स्टेशनचे इतर अंमलदारांनी पोलीस स्टेशनचे हद्दीत गस्त वाढविली होती.
दिनांक 03 जून रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान भिमराव रामचंद्र पिंगळे रा. पिगळेवस्ती शिरष्णे ता. बारामती हे आपल्या मोटारसाकल वरती मौजे पाहुणेवाडी गावचे हद्दीत फलटण बारामती रोडने घरी निघाले होते.
यावेळी दोन अनोळखी इसमांनी त्यांना मोटार सायकल आडवी मारून अडवले, मारहान केली पिंगळे यांचा मोबाईल व खिशातील 18 हजार रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली.
पोलिसांनी पिंगळे याकडून घडलेल्या घटनेचा वृत्तांत जाणून घेतला.यावेळी दोन आरोपी गुन्हा करीत असताना आपापसात बातचीत करीत होते त्यातील एका आरोपीने दुस-या आरोपीस अक्षय या नावाने बोलावले असं पिंगळे यांनी सांगितले.
माळेगांव पोलिसांनी तोच धागा पकडत गुप्त माहीती दारामार्फत माहिती काढून, तांत्रिक माहीतीचे आधारावर अक्षय चंद्रकांत जाधव वय.२४ वर्षे रा. खांडज ता. बारामती जि.पुणे आणि मनोज उर्फ बाबु शिवराज गालफाडे वय १९ वर्षे रा. बुरूडगल्ली पाहुणेवाडी ता. बारामती यांना ताब्यात घेतले.
त्यांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सदरची जबरी चोरी केल्याचे कबुल केले.पोलिसांनी त्यांच्याकडून पिंगळे यांचा मोबाईल व पाच हजार रोख रक्कम असा एकुण 18 हजार रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक संदिपसिंग गिल, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिराजदार, उपविभागिय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक देविदास साळवे, पो. हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राउत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे, अमोल वाघमारे यांनी केली आहे.
What's Your Reaction?