राज्यात इंदापूर आयएमए ठरली 'बेस्ट ब्रँच-बेस्ट प्रेसिडेंट आणि बेस्ट सेक्रेटरी'आवो गाव चले अभियान ठरले लक्षवेधी
आय मिरर
इंडियन मेडिकल असोशिएशन इंदापूर शाखेचा कारभार प्रथमचं महिलांच्या हाती सोपवण्यात आला आहे. इंदापूर शाखेचा कारभार हाती स्वीकारताचं महिला पदाधिकाऱ्यांनी राज्यस्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला असून इंडियन मेडिकल असोशिएशन इंदापूर शाखेला इतिहासात प्रथमच एकाचवेळी राज्यस्तरीय चार पुरस्कार मिळाले असून राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. राज्यातील 100 शाखांच्या मधून इंदापूर शाखेला हे सन्मान मिळाले आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याची राज्यस्तरीय डॉक्टरांची परिषद नुकतीच अमरावती येथे पार पडली यामध्ये इंदापूर शाखेला चार राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
बेस्ट स्मॉल ब्रँच इंदापूर इंडियन मेडिकल असोसिएशन, बेस्ट प्रेसिडेंट डॉ.कल्पना खाडे, बेस्ट सेक्रेटरी डॉ.प्रतिभा वनवे आणि आवो गाव चले या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष राज्यस्तरीय पुरस्कार देऊन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या इंदापूर शाखेला खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते भारताचे आयएमएचे अध्यक्ष एस. शंकरण, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ.रविंद्र कुटे व सचिव डाॅ.संतोष कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान देण्यात आला.
इंदापूर शाखेच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूरच्या अध्यक्षा डॉक्टर कल्पना खाडे सचिव डॉक्टर प्रतिभा वनवे डॉक्टर मिलिंद खाडे आणि डॉक्टर अतुल वनवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आवो गाव चले अभियान अंतर्गत इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेने सर्व डॉक्टरांच्या मदतीने इंदापूर तालुक्यातील पंधारवडी गाव एक वर्षासाठी आरोग्य सेवेकरिता दत्तक घेतले आहे. या गावात आरोग्याच्या बाबतीत विविध संकल्पना राबवत जनजागृती करण्यात आली.असून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी विविध डॉक्टरांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. किशोरवयीन मुली,महिलांमधील विविध आरोग्याच्या समस्या, मोतीबिंदू तपासणी यासह इतर महत्त्वाच्या तपासण्या आणि मार्गदर्शन शिबिरे या ठिकाणी घेण्यात आली आहेत.या उपक्रमाची राज्यातून दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन इंदापूर मेडिकल असोसिएशन शाखेला गौरवले असून राष्ट्रीय पातळीवरील सन्मानासाठी नामांकन करण्यात आले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखा ही आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारी सर्वोत्कृष्ट शाखा ठरली आहे. याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेचे मार्गदर्शक डॉक्टर राम अरणकर व इतर सर्व सदस्यांनी इंदापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंदापूरच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?