थकीत पाणीपट्टी भरा ! अन्यथा जलसंपदा विभागाकडून कारवाईचा इशारा, मोटार जप्तीच्या कारवाईनंतर अनेकांनी थकवलेल्या पट्ट्या भरल्या...
आय मिरर
पुण्याच्या इंदापुरात जलसंपदा विभागाने उजनी जलाशयावरील पाणीपट्टी थकबाकीदार शेतकऱ्यांच्या विद्युत पंपावर जप्तीची कारवाई केली आहे. अगोदरच युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतमालाचे बाजारभाव कोसळलेत तर दुसरीकडे अवकाळीचे संकट आहे.अशात जलसंपदा विभागाने केलेल्या या कारवाईमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.
अनेक वेळात थकीत पाणीपट्टी बाबत शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावून देखील शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी न भरल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र भीषण उन्हाळ्यात जलसंपदा विभागाने ही कारवाई केल्याने याच कारवाईबद्दल शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील गागरगाव येथील भीमा उपसा सिंचन शाखेने शिरसोडी,पडस्थळ, नरूटवाडी, कालठण नंबर दोन,गलांडवाडी नंबर एक,गागरगाव, आजोती आणि टाकळी या भागात ही कारवाई करीत शेतकऱ्यांचे विद्युत पंप जप्त केलेत.
दरम्यान यासंदर्भात पळसदेव शाखा अभियंता महेश दळवी यांनी सांगितले की काही शेतकऱ्यांनी लाखांच्या घरात आपल्या पाणीपट्टीच्या रकमा थकवलेल्या आहेत. ज्याच्याकडे चालू थकबाकी आहे अशा वरती आम्ही थेट कारवाई करत नाही. मात्र जे शेतकरी जाणीवपूर्वक शासनाचा महसूल थकवत आहेत अशांवरती कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. कारवाईचा बडगा उगारल्याच्यानंतर ज्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून लाखोंच्या घरात शासनाची पाणीपट्टीची रक्कम थकीत होती अशांनी तातडीने आपली थकबाकी भरून शासनास सहकार्य केला आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो. अशाच पद्धतीचा सहकार्य इतर शेतकऱ्यांनी देखील करणे गरजेचं आहे.
What's Your Reaction?