सरकारी रुग्णालयाचा बोगस शिक्का अन् बोगस सर्टिफिकेट ! डॉक्टरवर गुन्हा दाखल
आय मिरर
बारामती मध्ये एका डॉक्टरने शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का वापरून रुग्णाला बोगस सर्टिफिकेट दिल्याचा प्रकार समोर आलाय.याप्रकरणी डॉक्टर पांडुरंग संभाजी गावडे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सोमनाथराव जगताप यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डॉक्टर गावडे यांनी एक एप्रिल 2019 रोजी जखमी व्यक्ती अतुल धनाजी गावडे यांच्यावर स्वतःच्या खाजगी रुग्णालयात उपचार केले.डॉ.गावडे हे 2009 ते 2011 या कालावधीत बारामती मधील सिल्वर जुबली हॉस्पिटल या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू होते.
मात्र कार्यभार संपल्यानंतर देखील डॉ.गावडे यांनी एक एप्रिल 2019 रोजी जखमी व्यक्ती अतुल गावडे याला जे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले त्यावर मेडिकल ऑफिसर एस जे रुग्णालय बारामती हा शिक्का वापरून शासकीय अधिकृततेचा आभास निर्माण केला.
डॉक्टर गावडे यांनी त्यांच्या स्वतःच्या खाजगी रुग्णालयातून जे वैद्यकीय प्रमाणपत्र दिले आहे त्या प्रमाणपत्रावर त्यांनी डॉ.पांडुरंग गावडे मेडिकल ऑफिसर एस जे रुग्णालय बारामती असा शासकीय रुग्णालयाशी संबंध दर्शवणारा शिक्का वापरला आणि त्या प्रमाणपत्र शासकीय अधिकृततेचा आभास निर्माण केला. असा आरोप डॉक्टर गावडे यांच्यावर आहे. गावडे यांचा सिल्वर जुबली रुग्णालय बारामती शी 2019 मध्ये
कोणताही संबंध नसल्याने वैद्यकीय अधीक्षक जगताप यांच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलिसात डॉ.गावडे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष बाब म्हणजे सदरील वैद्यकीय प्रमाणपत्र हे 2019 बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वापरण्यात आलेले आहे. सदरील न्यायालयीन खटल्यामध्ये डॉक्टर पांडुरंग गावडे यांनी न्यायालयासमोर साक्ष नोंदवली असून प्रमाणपत्रावर असणारी सही आणि शिक्का आपला स्वतःचा असल्याचा त्यांनी मान्य केलं आहे.
डॉक्टर गावडे यांनी या प्रमाणपत्रावर शासकीय पदनाम दर्शवणारा शिक्का वापरून संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र अधिकृत व विश्वासार्ह स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे प्रमाणपत्र पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेत देखील वापरल्याचे निदर्शनास आले आहे.
What's Your Reaction?