गोविंदा आला रे आला..! उद्या जंक्शन मध्ये मोहोळकरांची दहीहंडी,गौतमी थिरकणार..! मंत्री भरणे गोरेंची उपस्थिती
आय मिरर
आपल्या हटके अदा आणि ठसकेबाज डान्स मुळे प्रसिद्ध असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील चा कलाविष्कार उद्या इंदापूरकरांना अनुभवता येणार आहे.इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे आयोजित केलेल्या रोहित मोहोळकर मित्र परिवार दहीहंडी उत्सव उत्सवाला गौतमी पाटील उपस्थिती लावणार आहे. त्यामुळे मोहोळकरांची दहीहंडी पंचक्रोशीत गाजणार हे नक्की.
सबसे कातिल गौतमी पाटील आपल्या कलेचा कलाविष्कार सादर करीत तरुणाईला घायाळ करत असल्याने आतापासून तरुणाईला मोहोळकरांच्या दहीहंडीचे वेध लागले आहेत.गौतमी सोबत मोहोळकरांच्या मंचावर उद्या राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,माजी आमदार यशवंत माने,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रदीप गारटकर,पीडिसीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,सचिन सपकळ,बापुराव शेंडे यांसह इंदापूरच्या राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.जंक्शन मधील आनंदनगर येथे हा सोहळा पार पडणार आहे.
इंदापूर बाजार समितीचे संचालक आणि आनंदनगर ग्रामपंचायतीचे सरपंच रोहित वसंतराव मोहोळकर यांनी यावर्षीही भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले असून शनिवारी सायंकाळी जंक्शन येथे हा सोहळा पार पडणार आहे.
मागील वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची मोहोळकरांच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती होती.यंदा मात्र सबसे कातिल गौतमी पाटील उपस्थित असणार आहे. दर विजेत्या दहीहंडी संघाला एक लाख 11 हजार 101 रुपयाचं पारितोषिक देखील दिले जाणार आहे.
पुणे- सोलापूर व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील दहीहंडी संघाची कामगिरी नेत्रदीपक असते.खऱ्या अर्थाने आपल्या भागात आपल्या लोकांसमोर या गोविंदांचा सन्मान व्हावा नवी पिढी, जुनी पिढी अशी ऋणानुबंधाची नाळ अधिक घट्ट व्हावी हाच उद्देश समोर ठेवून रोहित मोहोळकर व मित्र परिवाराच्यावतीने हा दहीहंडी महोत्सव दरवर्षी ठेवण्यात येतो. सहभागी गोविंदा पथकास योग्य ते बक्षीस व मानचिन्ह देण्यात येते.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन...
संपूर्ण राज्यामध जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहे. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात देखील अनेकांनी तयारी सुरू केली आहे.विधानसभेच्या निवडणुकीत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सहभागी झालेले आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विजयात जंक्शन परिसरातून मोठा हातभार लावणारे रोहित मोहोळकर यांनी देखील जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.तयामुळे या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवातून रोहित मोहोळकर मोठ मोठं शक्तिप्रदर्शन करतील असाही कयास बांधला जातोय.
ग्रामीण भागातील महिलांना देखील हा कार्यक्रम पाहता यावा अनुभवता यावा यासाठी आयोजकांकडून महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील नागरिकांनी महिला भगिनींनी, या महोत्सवात उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी रोहित मोहोळकर मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.
What's Your Reaction?