अकलूज पोलिसांनी पकडला तब्बल 25 लाख 68 हजार रुपये किमतीचा 129 किलो अवैद्य गांजा, दोघांना घेतलं ताब्यात

आय मिरर
अकलूज पोलिसांनी विक्रीसाठी बंदी असलेल्या गांजा हा अमली पदार्थ धाड टाकून हस्तगत केला आहे या कारवाईत पोलिसांच्या पथकाने आठ गोण्यासह एकूण 129 किलो 426 ग्रॅम वजनाचा 25 लाख 68 हजार 340 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याप्रकरणी अकलूज पोलिसांनी राजु महादेव काळुंखे रा. डांगेवस्ती, उजनी कॅनॉलजवळ, महाळुंग ता. माळशिरस,आनंद भगवान भिसे रा. महादेवनगर, अकलूज ता. माळशिरस यांचेविरुध्द
गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (सी), २२ (सी) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अकलूज पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजु महादेव काळुंखे रा. डांगे वस्ती,उजनी कॅनॉलजवळ महाळुंग ता. माळशिरस याने त्याचे घरी गांजा हा अंमली पदार्थ विक्रीसाठी साठा करून ठेवलेला आहे याची खबर अकलूज पोलिसांना 10 जून रोजी लागली होती.
तात्काळ या संदर्भातील माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली.शासकिय पंच, वजन काटा धारक,फोटोग्राफर व सहा. निबंधक (सक्षम अधिकारी), पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या ठिकाणी छापा घालत कारवाई केली.
या कारवाईत राजु काळुंखे याच्या घरामध्ये चार वेगवेगळ्या गोण्यात व घराचे बाहेरील बाजुस एका गोणीमध्ये खाकी रंगाचे कागदामध्ये पोलिसांना प्लास्टिकच्या चिकट टिपणी गुंडाळलेले पाऊच दिसून आले. पोलिसांनी त्या पाऊसच्या आत मधील पदार्थाची पाहणी केली असता त्यात गांजा या वनस्पतीची हिरवट रंगाची पाने, फुले, काड्या व बोंडे अंमली पदार्थ दिसुन आला.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे,स.पो.नि. योगेश लंगुटे,स.पो.नि.गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे,महिला पोलीस उपनिरीक्षक करिष्मा वणवे,पोलीस हवालदार सुहास क्षिरसागर, शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, किशोर गायकवाड, अजय बुरले, सोमनाथ माने, मोहन मरके, रणजित जगताप, प्रविण हिंगणगावकर, चालक महादेव जाधव, शरद आगलावे यांनी यांच्या पथकाने केली आहे.
What's Your Reaction?






