३० लाख रूपये किंमतीच्या १९ दुचाकी चोरणारा समाधान जेलमध्ये ! एलसीबी आणि बारामती तालुका पोलिसांची कारवाई

Aug 15, 2026 - 06:02
Aug 15, 2026 - 06:04
 0  64
३० लाख रूपये किंमतीच्या १९ दुचाकी चोरणारा समाधान जेलमध्ये ! एलसीबी आणि बारामती तालुका पोलिसांची कारवाई

आय मिरर 

बारामती तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केल आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या तब्बल तीस लाख रुपये किमतीच्या 19 दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये तब्बल 13 बुलेट गाड्या तर सहा इतर दुचाकींचा समावेश आहे. 

पोलिसांनी समाधान बाळू काळे या 23 वर्षीय आरोपीला अटक केली असून तो सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मानेवाडी येथील रहिवासी आहे. आरोपीने पोलिसांना 19 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

विशेष म्हणजे हा चोरटा व्ही.आय.पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटार सायकल रात्रीच्या वेळी चोरी करायचा आणि चोरी केलेल्या वाहनावर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावुन चोरी केलेल्या मोटार सायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता.

बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बारामती शहर तसेच बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील पंधरा दिवसा पासुन मोठ्या प्रमाणात बुलेट चोरी चे प्रमाण वाढले होते. याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका स्टेशन यांची पथके तयार करण्यात आली. बारामती शहर परिसरात गस्त करीत असताना एक संशईत व्यक्ती चोरीची मोटार सायकल घेवुन मेडिकल कॉलेज परिसरात येणार असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना प्राप्त झाली.

सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, बारामती तालुका पोलीस स्टेशन कडील अंमलदार यांनी सापळा लावला. त्या दरम्यान एक संशईत व्यक्ती हा चोरीची मोटार सायकल घेवुन पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेज कडे जात असताना दिसला. त्यास पोलिस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधान बाळू काळे वय २३ वर्ष रा.मानेवाडी ता. फलटण जि. सातारा येथील असल्याच समोर आलं.

पोलीस तपासात तो एकटाच व्ही.आय.पी नंबर प्लेट असलेल्या बुलेट व इतर मोटार सायकल रात्रीच्या वेळी चोरी करुन चोरी केलेल्या वाहनावर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र वनसेवा, एसटी महामंडळ असे लोगो लावुन चोरी केलेल्या मोटार सायकलचा वापर करुन पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सुधीर वाळुंज, श्रेणी पो.स.ई बाळासाहेब कारंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, बारामती तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, शशिकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे, विठ्ठल तरंगे, यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow