Baramati | अगोदर मुलाचा आणि दोन नातींचा अपघाती मृत्यू ; विरह सहन न झाल्याने आजोबांनी ही सोडले प्राण

आय मिरर
मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत घटनेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बारामतीत रविवारी घडली होती. या घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आला आहे.
या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज पहाटे निधन झाले ते निवृत्त शिक्षक होते.
रविवारी झालेल्या अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुली मधुरा व सई यांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती.या घटनेनंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
या घटनेचा धक्का सहन न झाल्याने आणि अपघातात आपला मुलगा आणि दोन्ही नातींनी जीव गमावल्याने या धक्क्यामुळे राजेंद्र आचार्य यांचेही निधन झाले आहे. यामुळे आचार्य कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.
आचार्य कुटुंब मूळचं इंदापूर तालुक्यातील सणसर गावचं...
काल रविवारी 27 जुलै रोजी सकाळी साडेअकरा च्या सुमारास बारामती मधील महात्मा फुले चौकात ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज ओंकार यांच्या वडीलांचे निधन झालं आहे.आचार्य यांच्या घरातील 4 जण 24 तासाच्या आत मृत्यूमुखी पडले.मृत पावलेल्या व्यक्ती या मूळच्या इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या त्या बारामती तालुक्यातील मोरगाव रोड येथे वास्तव्यास होत्या.
महात्मा फुले चौकात घडली काळीज पिळवणारी घटना...
बारामती मधील महात्मा फुले चौकात रविवारी 27 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास काळजाला पिळवून टाकणारी ही घटना घडली. एम एच सोळा १६ सी ए ०२१२ या डंपर खाली दुचाकी चिरडली गेली.यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. डंपर खाली दुचाकी चिरडल्या गेल्याने दुचाकी चालवत असलेले ओंकार आचार्य यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ओंकार आचार्य यांचे वडील यांचाही या धक्क्याने आज मृत्यू झाला आहे.या घटनेचा बारामती पोलीस अधिक तपास करत आहेत.
What's Your Reaction?






