कोकाटे चांगलं काम करतात पण तोंडाला कुलूप गरजेचं सदाभाऊंचा कोकाटेंना सल्ला

आय मिरर
गेल्या काही दिवसापासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल सतत बेताल वक्तव्य करीत आहेत. तर शेतकरी भिकारी नसून राज्य सरकार भिकारी असल्याचे विधानही आता माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. कोकाटे यांच्या या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामाची मागणी होत असताना अद्याप पर्यंत राजीनामा झालेला नाही ? यावर राज्याचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांना प्रश्न विचारला असता कोकाटे चांगलं काम करत आहेत मात्र कधीकधी तोंडाला कुलूप असणं गरजेचं असतं असं सदाभाऊ खोत यांनी म्हटल आहे.
2011 साली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यासह इतर साखर कारखान्यांवर ऊसदरा प्रश्न केलेल्या आंदोलन प्रकरणी सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर इंदापूर न्यायालयामध्ये खटला सुरू आहे या खटल्याच्या संदर्भात हे दोघेही नेते आज इंदापूर मध्ये आले होते.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अद्याप पर्यंत राजीनामा झाला नाही या संदर्भात खोत यांना प्रसार माध्यमांनी विचारलं असता सदाभाऊ म्हणाले की, सगळ्याच लोकप्रतिनिधींनी संवेदना जाग्या ठेवून बोललं पाहिजे विधिमंडळ हे पवित्र कायदेमंडळाचे ठिकाण आहे.
माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य आहे पारावरच असावं अशा प्रकारचा आहे. त्यांचा कामाचा झपाटा बघितला तर चांगला आहे पण तोंडाला कुठेतरी कुलूप असणं सुद्धा गरजेचे आहे असा खोचक सल्लाही खोत यांनी माणिकराव कोकाटे यांना दिला आहे.
विधिमंडळ चौकशी समितीचा एक अहवाल आला असून यात माणिकराव कोकाटे तब्बल वीस मिनिटे पत्ते खेळत आहेत असं ट्विट रोहित पवार यांनी केला आहे यावर बोलताना खोत म्हणाले, विधानपरिषद आणि विधानसभा याचे नियंत्रण अध्यक्ष सभापती यांच्याकडे असत खरं तर त्यांचा निर्णय सभापती घेत असतात.
गाढवाने हसावं अशातला हा प्रकार...
दरम्यान भ्रष्टाचारी नेत्यांना वाचवण्यासाठी राज्यात फडणवीस ॲक्ट आणला आहे राज्यपाल कारवाई करत नाही त्यामुळे आम्ही राष्ट्रपतीकडे जाणार आहोत अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकार वरती केले आहे याबरोबर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले
संजय राऊत यांनी राज्यपाल कारवाई करत नाही हे वक्तव्य करावं म्हणजे म्हणजे गाढवाने हसावं अशातला हा प्रकार आहे अशी टीका होत यांनी केली.
देवा भाऊच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम...
महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अशी वक्तव्य झाले आहे त्या काळात सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ही माध्यम फार कमी होती. आता ही मध्यम जनतेच्या समोर सहज उपलब्ध असल्याने नेत्यांनी केलेली वक्तव्य टीका सहज दिसून येतात असंही खोतांनी सांगितलं.
मात्र असं असलं तरी महायुती एकसंघ आहे, देवा भाऊच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम आहे. कोणी कितीही बिबे घालण्याचा प्रयत्न केला तरी युती युतीतून कोणी उठणार नाही. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त जेवणाचा कार्यक्रम होता त्याला त्यांनी कोणाला निमंत्रण द्यावा हा त्यांचा प्रश्न मला वाटतं त्यांनी सगळ्यांना निमंत्रण दिला असाव. असही खोतांनी सांगितलं आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन योजना राबवाव्यात...
तर सोमनाथ सोमवंशी मारहाण प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत राज्य सरकारला धक्का दिलाय यावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की,शेवटी प्रत्येक संस्थेचं स्वतंत्र अस्तित्व त्या त्या संस्थेला निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे असं मला वाटत. शक्तिपीठ मार्गावरून ही खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकासात्मक योजना राबवाव्यात माझी ही भूमिका पहिल्यापासून आहे आणि आजही तीच आहे असंही खोत यांनी सांगितले.
तर त्यांनी धडक मारावी...
मराठा आरक्षण प्रश्न पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबई वरती चाल करणार आहेत. मुंबईमधील कोणता मैदान ठिकाण योग्य याची पाहणी ही नुकतीच करण्यात आली असून यासंदर्भात ही खोतांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता सदाभाऊ म्हणाले, एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांनी या राज्यात मराठा समाजाची चळवळ उभा केली सर्वसामान्य गरीब समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका नेहमी घेतली. परंतु ज्यावेळी आंदोलनाचा पाऊल आपण उचलत असतो त्यावेळी जर पुढचे चर्चेचे दरवाजे जर बंद असतील तर त्याला आपण धडक मारायची असते, त्यांनी संवादाचा मार्ग निवडावा सरकार बरोबर चर्चा करावी. दरवाजे बंद झाले तर त्यांनी धडक मारावी.
What's Your Reaction?






