Indapur | त्या चौघांनी बाळासाहेबांना जबरदस्तीने गाडीत बसवलं अन् 48 हजार पाचशे रुपये लुटलं...

आय मिरर
24 तास वाहणाऱ्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे.चार अज्ञात व्यक्तींनी एकाला जबरदस्तीने आपल्या गाडीत बसवून त्याचा मोबाईल हिसकावून घेत फोन पे अकाउंट मधून 48 हजार पाचशे रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या हद्दीत ही घटना घडली याप्रकरणी इंदापूर पोलिसात दोन अज्ञात पुरुष आणि दोन अज्ञात महिला अशा चार अज्ञात व्यक्तीं विरोधात बाळासाहेब चंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील पळसदेव नजीक असणाऱ्या एका हॉटेल समोर फिर्यादी बाळासाहेब चंबरे हे आपल्या दुचाकी सह थांबले होते. यावेळी एका चार चाकी वाहनातून दोन पुरुष आणि दोन महिला असे चार जण आले.त्यांनी बाळासाहेब चंबरे त्यांना त्यांच्या गाडीत जबरदस्तीने बसवलं, त्यांना मारहाण केली.
त्यानंतर आरोपींनी चंबरे यांचा मोबाईल हिसकावून घेत फोन पे अकाउंट वरून वंदना जाधव या व्यक्तीच्या खात्यावर 48 हजार पाचशे रुपये ट्रान्सफर करून घेतले.
मारहाणीनंतर आरोपींनी चंबरे यांना कौठळी गावाजवळ सोडून दिलं. आणि आरोपी त्यांच्या वाहनासह पसार झाले. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चौघा अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लेंडवे अधिक तपास करीत आहेत.
What's Your Reaction?






