धक्कादायक | बारामतीतील भीषण अपघातात बापासह दोन चिमुकल्या ठार

आय मिरर
बारामती मधील महात्मा फुले चौकात भीषण अपघात झालाय मालवाहतूक करणाऱ्या डंपरचा आणि दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत असून यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या सोबतच दुचाकी स्वारा बरोबर असलेल्या दोन लहान मुली देखील गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा बारामती पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी 27 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. डंपरच्या चाकाखाली दुचाकी चेंगरून चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ओंकार आचार्य असा मृत व्यक्तीचं नाव असून या अपघातात त्यांची चार वर्षाची मुलगी मधुरा ओंकार आचार्य आणि दहा वर्षाची मुलगी सही ओंकार आचार्य या दोघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
एम एच सोळा १६ सी ए ०२१२ या डंपर खाली दुचाकी चिरडली आणि या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेला व्यक्ती हा मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या तो बारामती तालुक्यातील मोरगाव रोड येथे वास्तव्यास होता.
What's Your Reaction?






