दोघे जण आले सोनं पॉलिश करून देतो म्हणाले,अन् ...1 लाख 33 हजारांची फसवणूक

आय मिरर
इंदापूर शहरात एका महिलेला सोनं पॉलिश करून देतो असं सांगत दोन अज्ञातांनी 1 लाख 33 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांना गंडा घातला आहे. निर्मला गुप्ता यांना दोन अनोळखी व्यक्तींनी तुमचं सोनं पॉलिश करून देतो असं सांगून मंगळसूत्र अंगठी आणि कानातील सोन्याचे दागिने तांब्यात ठेवायला लावले मग ते गॅसवर ठेवायचे म्हणत हात चालकीने सोन लंपास केलं. या दोघांविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत निर्मला पारस गुप्ता (वय ५५ वर्ष व्यवसाय गृहिणी रा. इंदापूर पाटील बंगला ता. इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता.२१) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या राहते घराचे समोर दोन अनोळखी इसमांनी तुमचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे म्हणून फिर्यादीकडील ७० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,
२८ हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील कुडे व ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची मोराची नक्षी असलेली सोन्याची अंगठी असे एकूण एक लाख ३३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने तांब्यामध्ये ठेवून गॅसवर ठेवण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करीत तांब्यामध्ये दागिने न ठेवता हातचलाकीने फिर्यादीची फसवणूक केली.
या वरून अज्ञात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.
What's Your Reaction?






