BARAMATI बारामतीत गाडी दुरुस्ती करणाऱ्या गोडाऊनला आग, आगीचं कारण अस्पष्ट...

आय मिरर
बारामतीत गाडी दुरुस्ती करणाऱ्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.मिळत असलेल्या माहितीनुसार बारामती मधील फलटण रोडवरील एका चार चाकी डेंटिंग पेंटिंगच्या गोडाऊनलाही ही आग लागल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी दोन अग्निशामक च्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आज सोमवारी 21 जुलै रोजी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बारामती मधील फलटण रोडवरील एका चार चाकी डेंटिंग पेंटिंग गोडाऊनला ही आग लागण्याची प्राथमिक माहिती समोर येत असून ही आग नेमकी कोणत्या कारणातून लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन अग्निशामकच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी बारामती नगर परिषदेची यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा देखील दाखल झाली आहे.
What's Your Reaction?






