इंदापूर तालुक्यातील डाळज जवळ केळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग

Feb 3, 2025 - 20:10
Feb 4, 2025 - 06:42
 0  392
इंदापूर तालुक्यातील डाळज जवळ केळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग

आय मिरर

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील डाळज जवळ केळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागली. सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता.

आग लागल्यानंतर घटनास्थळी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान दाखल होत त्यांनी ही आग आटोक्यात आणली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनाचे मात्र मोठे नुकसान झालं आहे.

सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने केळी घेऊन हा कंटेनर निघाला होता दरम्यान डाळज नजीक या कंटेनरला अचानक आग लागली. घटना समजतात तात्काळ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान उमेश जाधव प्रदीप मगर यांसोबत महामार्ग इंदापूर पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक महेश कुरेवाड, पोलीस हवालदार दत्तात्रय जगदाळे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यावश्यक असणाऱ्या अग्नी शामक सिलेंडरच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow