इंदापुरात ते सर्वजण एकत्र आले काही पैसे जमवले अन् केलं हे काम...

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये 1984 - 85 च्या माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला तब्बल 51 हजार रुपयांच शालेय उपयोगी साहित्य भेट म्हणून दिलय. सामाजिक बांधिलकीतून माजी विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं संपूर्ण इंदापूर शहरात कौतुक होतंय.
इंदापूर नगरपरिषदेच्या शेजारी असणाऱ्या मुलांच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक-१ला सन १९८४-८५ च्या माजी विद्यार्थ्यांकडून मुलांना बसण्यासाठी पन्नास फूट लांबीच्या आठ चटई, साऊंड सिस्टीम व स्टेनलेस स्टीलचे पाच चप्पल स्टॅंड असे एकूण ५१,००० रूपयांचे शालेय साहित्य भेट देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, प्रसिद्ध वास्तुविशारद वसंतराव माळुंजकर, नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम, सामाजिक कार्यकर्ते शकील सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड.इनायतअली काझी, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सुहास मोरे,प्रशांत घुले, सामाजिक कार्यकर्ते केशव नगरे उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थी यांचेकडून गुरूवर्य सोपान गायकवाड गुरूजी व चिंचकर मॅडम यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,भरत शहा, वसंतराव माळुंजकर, कैलास कदम यांची यावेळी भाषणे झाली.
जिल्हा परिषद शाळा क्रमांक-१ च्या सहशिक्षिका रूक्साना शेख यांनी शाळेतील समस्या मांडल्या.शाळेतील गेट जवळ असणाऱ्या मुतारीचा मुलांना उपयोग न होता सार्वजनिक म्हणून नागरिकांकडून उपयोग होत असून त्याची स्वच्छता शाळा करू शकत नाही तरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या.
शाळेतील मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा खर्च नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कडून केला जाईल असे आश्वासन भरत शहा यांनी यावेळी दिले.प्रदीप गारटकर व वसंतराव माळुंजकर यांनी रोटरी क्लब व इतर माध्यमातून मुलांच्या शौचालय व मुतारीचा प्रश्न सहा महिन्यांत मार्गी लावू असे आश्वासन दिले.तर सन १९८४-८५ च्या माजी विद्यार्थ्यांकडून शौचालय व मुतारीसाठी शाळेला २५००० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्याध्यापिका मंदाकिनी बोराटे व सहशिक्षिका रूक्साना शेख,भारती पौळकर,पुष्पा दळवी, वैशाली वर्तले, ज्योती पवार यांनी स्वागत केले.सुत्रसंचालन संजय चौगुले यांनी तर आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम सागर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वतीसाठी सन १९८४-८५ चे माजी विद्यार्थी विष्णू पवार, योगेश गुंडेकर, इंजिनिअर सोमनाथ गवळी, इरफान शेख, राजाराम सागर,रामहरी कदम,संजय चौगुले,राहुल जगताप,अमोल इंगोले, रणजित थोरात,आतिष दोशी यांनी प्रयत्न केले.
What's Your Reaction?






