21 चोऱ्या खपल्या 22 व्या वेळी इंदापूर पोलिसांनी गेम केला अन् टोळीचं हाती लागली...

Jul 22, 2025 - 09:17
Jul 22, 2025 - 09:19
 0  3644
21 चोऱ्या खपल्या 22 व्या वेळी इंदापूर पोलिसांनी गेम केला अन्  टोळीचं हाती लागली...

आय मिरर 

इंदापूरात जबरी चोरीच्या तपासातून मोठं चोरीचं रॅकेट उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीकडून तब्बल 22 गुन्ह्यांची उकल केली असून या टोळीने मागील दोन वर्षांत 21 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. यात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील 13 पाण्याच्या मोटारी, 3 सोलर प्लेट्स आणि 5 शेळ्या- बोकडांचा समावेश असून 61 हजार 500 रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

खंडु उर्फ राहुल अशोक महाजन वय 19 वर्षे याला पोलिसांनी अटक केली पोलिस तपासात या विविध 21 गुन्ह्यांमध्ये सचिन कांबळे, साहिल चौधरी आणि रोहित कटाळे यांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे.

इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिनांक 10 जुलै रोजी रात्री 01 चे सुमारास वडापुरी गावच्या हद्दीत वरकुटे खु रोडवरुन बद्रीनाथ रामु राठोड वय 30 वर्ष रा.भगवान बाबानगर रुई ता. बरामती जि.पुणे यांचे दोन कामगारांना अज्ञात दोन आरोपींनी मारहाण करुन त्यांचेकडून त्याचा मोबाईल, मोटारसायकल, ट्रकची बॅटरी व रोख रक्क्म दोन हजार रुपये असा एकुण 28 हजार रुपयाचा मुदद्देमाल चाकुचा धाक दाखवुन लुटला होता. या संदर्भात इंदापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीमार्फत सदरचा गुन्हा करणारे दोन आरोपींची गोपनिय माहीती मिळाली. त्यांना शिताफिने ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील मुदद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील खंडु उर्फ राहुल अशोक महाजन वय १९ वर्षे व एक विधीसंघर्षीत बालक दोघेही इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी तसेच त्यांचे साथीदार सचिन अरुण कांबळे रा. वरकुटे खुर्द इंदापुर, साहिल विलास चौधरी आणि रोहित दत्तत्रय कटाळे राहणार उरूळीकांचन ता हवेली असे आम्ही मिळून मागील दोन वर्षांपासुन शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी व शेळया बोकडे तसेच विहीरीवरील सोलर प्लेटा यांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. 

त्यांनी एकुण 21 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली असुन त्यापैकी इंदापुरच्या आजुबाजुच्या परीसरातुन शेतकऱ्यांच्या विहीरीवरील पाण्याच्या मोटार चोरीचे एकुण 13 गुन्हे तसेच मोटार चालवण्यासाठी लागणाऱ्या सोलरच्या प्लेटा चोरीचे एकुण 3 गुन्हे आणि शेळया व बोकडे चोरीचे एकुण 05 गुन्हे उघडकिस आणण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून 33 हजार 500 किमतीचा मुद्दे‌माल जप्त केला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक संदिप गिल,अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, पोलीस हवालदार सलमान खान, पोलीस अमलदार गणेश डेरे, अंकुश माने, तुषार चव्हाण, सुरज गुंजाळ, विनोद लोखंडे, नंदु जाधव, योगेश कर्चे, दिनेश चोरमले यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow