बारामती पाटस पालखी मार्गावर दुचाकीचा समोरासमोर अपघात,दोघांचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

Jul 21, 2025 - 16:59
Jul 21, 2025 - 17:00
 0  810
बारामती पाटस पालखी मार्गावर दुचाकीचा समोरासमोर अपघात,दोघांचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

आय मिरर 

बारामती पाटस पालखी महामार्गावर जराडवाडी गावाच्या हद्दीत बारामतीकडून पाटस कडे जाणाऱ्या दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर महिला जखमी झाली आहे.

शरद दत्तात्रय मोरे वय 36 वर्षे सोनवडी ता. बारामती व ज्ञानेश्वर बबन वलेकर वय 42 वर्षे,दहिगाव तालुका माळशिरस अशी मृतांची नावे असून आक्कामाई ज्ञानेश्वर वलेकर असं जखमी महिलेच नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी दिनांक 20 जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बारामतीकडून पाटस कडे जाणाऱ्या दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन ही घटना घडली. 

काही दिवसांपूर्वीच विशाल कोकरे या कुरकुंभ एमआयडीसी मध्ये नोकरीस असलेल्या पणदरे परिसरातील युवकाचा अशाच पद्धतीने विरुद्ध बाजूने चारचाकी आल्याने अपघात होऊन मृत्यू झाला होता.

आजही झालेल्या अपघातात एक दुचाकी विरुद्ध बाजूने आल्याने पाटसकडे निघालेल्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामध्ये दोन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले तर दोघांचा मृत्यू झाला.

या घटनेत शरद मोरे हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून बारामतीकडे निघाले होते तर ज्ञानेश्वर वलेकर हे त्यांची पत्नीसह दुचाकीवरून पाटसकडे निघाले होते. जराडवाडी गावाच्या हद्दीत आठवा मैलनजीक या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली.त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर महिला गंभीर जखमी झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow