पुढच्या आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता : उपमुख्यमंत्री अजित पवार

Oct 31, 2025 - 21:33
Oct 31, 2025 - 21:36
 0  196
पुढच्या आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता : उपमुख्यमंत्री अजित पवार

आय मिरर 

कुठल्याही क्षणी पुढच्या आठवडाभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये म्हटलं आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप शुभारंभाच्या गव्हाण पूजन प्रसंगी कार्यक्रमात अजित पवारांनी हे विधान केलं आहे.

मला इथे अनेक प्रकारची विविध निवेदन देण्यात आली आहे, मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगतो कुठल्याही क्षणी पुढच्या आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आता जिल्हा परिषदा तालुका पंचायत समिती आणि नगरपरिषदा महानगरपालिका नगरपंचायत या सर्व निवडणुका होईपर्यंत आता कुठलाही निधी मिळणार नाही.

आपला झोप डीपी रिसीवचा निधी होता तो 70 टक्के मी आमदारांना दिला आहे. बाकीचा निधी वेगवेगळ्या कामाकरिता वापरला असल्याचा स्पष्टीकरण ही अजित पवार यांनी दिले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की,ऊस तोडणाऱ्या टोळ्यांनी आमची फसवणूक केली आहे अशी निवेदन मला येत आहेत. काहींनी विकास कामाच्या करता निधी द्यावा अशी मागणी केली आहे. पण मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकी होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही.तुम्ही मला साथ देता म्हणून मी वेगवेगळे प्रकल्प आणतो आणि इथं खर्च करतो.मी पैसा कसा आणतो माझा मला माहितीये.पण पैशाचा विनियोग नीट होत नाही.मी प्रत्येक वेळी मला बोलायला चांगलं वाटत नाही.मला दुसरे येतं जे आमच्या पेक्षा त्याची पूर्तता होत नाही.

पुरंदर विमानतळ होत आहे.आम्हालाही वाटते शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊ नये पण पुण्याचे विमानतळ लष्कराच्या हातात आहे.ते म्हटले तसं वागावं लागतं त्याच्यामुळे पुरंदरला विमानतळ करणं गरजेचं आहे.मुंबईत विमानतळावर पहा अर्धा अर्धा तास गिरट्या मारत बसतात लँडिंगला जागा मिळत नाही म्हणून पुरंदरच विमानतळ होणं गरजेचं आहे.

घेतलेल्या जमिनीचा काही भाग त्यांना देणार त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढीचा नुकसान व्हायला नको.लोक आपल्या पाठीशी आहेत म्हणून त्यांना पाहिजे तसं वापरून घ्यायचं असं चालत नाही.पवार साहेब ज्यावेळेस निवडणूक लढले त्यावेळेस 17000 मतदार होते आज एक लाख विद्यार्थी बारामतीमध्ये शिकत आहेत.रेल्वे विस्तारीकरण चालू आहे तर माझ्याकडे येत आहेत आणि सांगतात दादा माझी जमिनीकडे पण तिकडे पण आता मी काय करू बोगदे काढत बसू का? काही प्रमाणात आम्ही बोगदे काढू पण विकास होताना काही गोष्टी ऍडजेस्ट कराव्या लागतात.

माझ्या लहानपणी मला वाटलं होतं जसजशी माणसे शिकतील तसतसं देवदर्शन कमी होईल परंतु पण उलट झालाय जेवढे जास्त शिकले तेवढे जास्त दर्शनाला जायला लागलेत. काही जण असं सांगतात की तिथे तिथे गेल्यावर त्या पदावर राहत नाही मी 25 वर्ष झालं पिंपरी चिंचवडला जातोय मी त्याच पदावर राहीलोय काही सांगतात काही सुपीक कल्पना काढतात.

आम्हाला निवडून यायचं होत म्हणून आम्ही बोललो...

राज्यात अतिवृष्टी झाली, पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेल आहे. पंचनामे वाढत आहेत 32 हजार कोटीचा आकडा 40 हजार कोटीवर जायाला लागला.शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा ना? की सारखच माफ सारखच फुकट सारखच माफ साहेबांनी एकदा दिली. आता आम्हाला निवडून यायचं होत म्हणून आम्ही बोललो त्यासाठी काही पैसे खर्च करावं लागतं ना.

ज्या प्रमाणात कारखान्याचे कॅपॅसिटी वाढवली जाते त्या प्रमाणात उसाचे क्षेत्र वाढले जात नाही.एका शेतकऱ्यांने 120 टन ऊस काढला इथे बसलेल्यांचे काही जण 30 टन ऊस काढत नाहीत जे नीट व्यवसाय करतात जे गावभर गप्पा मारतात त्यांचं उत्पन्न कमी आहे.आठवड्यात निवडणूक जाहीर होतील.जो काही विकास झाला तो आपण एकोप्याने राहिलो म्हणून झाला आहे.तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असं सांगायलाही अजित पवार विसरले नाहीत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow