बिग ब्रेकींग | “डेथ स्टंट ऑन हायवे !” इंदापूर बायपासवर भरधाव कारचा थरार

May 12, 2026 - 15:11
May 12, 2026 - 15:14
 0  1660
बिग ब्रेकींग | “डेथ स्टंट ऑन हायवे !” इंदापूर बायपासवर भरधाव कारचा थरार

आय मिरर 

पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर बायपास येथे भरधाव कार चालकांनी धोकादायक स्टंटबाजी करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमातून वायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काही कारचालक महामार्गावर वेगाने गाड्या चालवत धोकादायक कसरती करताना दिसत आहेत.या बेफाम प्रकारामुळे इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अशा स्टंटबाज वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर शहराच्या बाह्य वळणावरील हा व्हिडिओ असल्याचं यातून दिसून येत आहे. लाल रंगाची ब्रिजा कार क्रमांक MH 14 JE 9389 मधील एक तरुण ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरील खिडकीमधून बाहेर लटकतो. आणि अर्ध शरीर बाहेर काढून स्टंटबाजी करतो. याच वेळी या ब्रीजा कारच्या पाठीमागील एका वाहन चालकाने हा व्हिडिओ त्याच्या मोबाईल कॅमेरा रेकॉर्ड केला असल्याचं दिसून येत आहे. 

अशा पद्धतीने स्टंटबाजी करून संबंधित तरुण स्वतःचा जीव तर धोक्यात घालत आहेच मात्र इतरांचा जीव देखील तो धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे संबंधित कारचालकावर आणि स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर आता पोलीस खातं कारवाई करणार का हे पाहावे लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow