बारामतीत सहयोग सोसायटी जवळ ट्रकच्या धडकेत कोसळलं झाड ; सुदैवाने जीवितहानी नाही
आय मिरर
बारामती शहरात बारामती भिगवण रस्त्यावर सहयोग सोसायटी जवळ एका ट्रकच्या धडकेत रस्त्याच्या कडे वरील एक झाड कोसळले गेल आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. हा रस्ता नेहमी वाहतुकीसाठी गजबजलेला असतो,अनावधानाने हे झाड जर एखाद्याच्या अंगावर कोसळलं असतं तर मग मात्र मोठी दुर्घटना या ठिकाणी घडली असती.
मिळालेल्या माहितीनुसार,बारामतीकडून एमआयडीसीच्या दिशेने जाणारा MH 12 FZ 8573 क्रमांकाचा ट्रक भिगवण रोडवरून जात असताना झालेल्या अपघातात रस्त्यालगतची तीन झाडे पडल्याची घटना सहयोग सोसायटीसमोर घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
ट्रक चालक अनिल जगन्नाथ वनवे हे जेसीबी वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन झाडांना धडक बसली. या धडकेत झाडांचे मोठे नुकसान झाले. संबंधित ट्रकचे मालक तुकाराम चौधर असल्याचे समजते.
विशेष म्हणजे, भिगवण रोडवरील वृक्षसंवर्धनासाठी बारामती नगरपालिका प्रशासन गेल्या अनेक महिन्यांपासून अहोरात्र मेहनत घेत आहे. उन्हाळ्यात झाडे जिवंत राहावीत यासाठी नियमित पाणीपुरवठा, देखभाल आणि संरक्षणाची कामे सातत्याने करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत एका निष्काळजीपणामुळे तीन झाडांचे नुकसान झाल्याने नागरिकांनी तीव्र खंत व्यक्त केली.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, बारामतीमध्ये पर्यावरण संवर्धन आणि हरित विकासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी वाहनचालकांनी अधिक जबाबदारीने वाहन चालविण्याची गरज आहे.
दरम्यान, पवार कुटुंबाचे वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाबाबत असलेले विशेष प्रेम सर्वश्रुत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही झाडांचे नुकसान झाल्याबद्दल हळहळ व्यक्त केल्याची माहिती मिळाली. तसेच नुकसान झालेल्या झाडांच्या जागी नव्याने वृक्षारोपण करून हरित वारसा अधिक बळकट करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?