इंदापूरच्या जय भवानीगड विकास प्रतिष्ठानची हिबा पल्लीपरमबील बारावीत तालुक्यात प्रथम! संस्थेने जपली उज्वल यशाची परंपरा
आय मिरर
उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2026 चा आज निकाल जाहीर करण्यात आला यात इंदापूर तालुक्यातील जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील हीबा पल्लीपरमबील या विद्यार्थिनीने सहाशे पैकी 539 म्हणजेच 89.83 टक्के गुण मिळवत इंदापूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते श्रीमंत ढोले यांनी दिली.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा 2026 च्या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 327 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी 327 विद्यार्थी पात्र झाले आहेत म्हणजेच विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये विज्ञान व कॉमर्स अशा दोन शाखा असून दोन्ही शाखेतील उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
327 विद्यार्थ्यांपैकी 318 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह पास झाले आहेत. 09 विद्यार्थी द्वितीय श्रेणीने पास झाले आहेत.
विज्ञान विभागातील एकूण 283 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, पीकविज्ञान या विषयात 10 विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
गुनानुक्रमे निकाल खालील प्रमाणे
1) पल्लीपरमबील हीबा अब्दुल हमीद 539/600 89.83%
2) यादव प्राची राहुल 522/600 87.00%
3) यादव प्रिया राहुल 510/600 85.00%
वाणिज्य विभाग
1) कवडे अनुष्का सोमनाथ 535/600 89.17%
2) कवडे वैष्णवी विठ्ठल 534/600 89.00%
3) राजमाने आकांक्षा बाळासाहेब 499/600 83.17%
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा गटनेते, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले,उपाध्यक्ष तथा लाखेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच चित्रलेखा ढोले, सचिव हर्षवर्धन खाडे सहसचिव पौर्णिमा पोर्णिमा खाडे,मुख्य सल्लागार प्रदीप गुरव,विश्वस्त पृथ्वीराज ढोले,ऋषिकेश ढोले, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार,प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर,विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर,मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?