बस स्टँडवर तिला एकटीला पाहून झाकीरची नियत फिरली ; तिनं कॅमेरा ऑन करताच पुढे काय घडलं वाचा सविस्तर...

May 25, 2026 - 17:11
May 25, 2026 - 17:22
 0  434
बस स्टँडवर तिला एकटीला पाहून झाकीरची नियत फिरली ; तिनं कॅमेरा ऑन करताच पुढे काय घडलं वाचा सविस्तर...

आय मिरर 

पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका विकृत तरुणाने बस स्टँडवर उभ्या असलेल्या एकट्या तरुणीला पाहून विकृत चाळे केले आहेत.

नराधमाचा हा प्रकार पाहून तरुणीने धाडस दाखवलं आणि त्याचे चाळे आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. कॅमेरा ऑन होताच नराधमाने अंगातील जॅकेट आणि टोपी टाकून पळ काढला आहे. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

ही घटना चिंचवड येथील मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळील बीआरटी बस स्थानकाजवळ घडली. आरोपीनं इथं उभ्या असलेल्या २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग करत तिच्यासमोर अश्लील चाळे केले होते. नराधमाला पिंपरी पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत बेड्या ठोकल्या आहेत. झाकीर हमीद शेख (रा. वाल्हेकरवाडी) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पीडित तरुणीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला होता, ज्याच्या मदतीने पोलिसांना आरोपीचा माग काढणे सोपे झाले.

नक्की काय घडलं ? 

 समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ मे रोजी सकाळी पाऊणे आठच्या सुमारास घडली. पीडित २४ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे आपल्या कंपनीच्या बसची वाट पाहत एम्पायर इस्टेट बीआरटी बस स्टॉपवर उभी होती. याच दरम्यान आरोपी झाकीर शेख तिथे आला आणि त्याने तरुणीकडे पाहत अत्यंत किळसवाणे आणि अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली.

नराधमाच्या या कृत्यामुळे घाबरून न जाता तरुणीने धाडस दाखवलं आणि तिने तत्काळ आपला मोबाईल काढत आरोपीचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. आपण कॅमेऱ्यात कैद होत आहोत हे लक्षात येताच आरोपी झाकीरची धांदल उडाली. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने अंगातील जॅकेट आणि डोक्यावरील टोपी भररस्त्यात फेकून दिली आणि तिथून पळ काढला.

१०० हून अधिक सीसीटीव्ही तपासले...

या घटनेनंतर पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील तब्बल १०० हून अधिक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

या तांत्रिक विश्लेषणाच्या आणि पीडितेने बनवलेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा अचूक माग काढला आणि त्याला वाल्हेकरवाडी परिसरातून ताब्यात घेतलं. पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी झाकीर शेखविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow