दौंड तालुक्यातील राहू मधून 27 ऊसतोड कामगारांची सुटका, हिरामण गणपत गाढवे विरोधात यवत पोलिसात गुन्हा 

Nov 1, 2025 - 07:36
Nov 1, 2025 - 07:39
 0  3689
दौंड तालुक्यातील राहू मधून 27 ऊसतोड कामगारांची सुटका, हिरामण गणपत गाढवे विरोधात यवत पोलिसात गुन्हा 

आय मिरर 

पुण्याच्या दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथे बंद करून ठेवलेल्या 27 ऊसतोड वेठबिगार कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बंधमुक्त करण्यात आले आहे.यवत पोलिस आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या 27 कामगारांची सुटका करण्यात आली आहे. 

या सर्व ऊसतोड मजुरांना कामगारांना हिरामण गणपत गाढवे यांनी बंधक ठेवले होते. या सर्व कामगारांना मारहाण, शिवीगाळ, दमदाटी व महिलांचा अनादर करण्यात येत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं.आता या सर्व कामगारांची सुटका करण्यात आली असूनही यवत पोलीस ठाण्यात हिरामण गणपत गाढवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व कामगार दौंड तालुक्यातील राहू माधवनगर येथील जमीन मालक हिरामण गणपत गाढवे याच्याकडे ऊस तोडणी साठी आले होते. मात्र गाढवे यांनी या कामगारांना आपल्या गावाकडे परत जाण्यास मज्जाव केला त्यांना बंधक करून ठेवले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील मानेवाडी येथील नाना जाधव यांनी या संदर्भात पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी यवत पोलीस आणि दौंड तहसीलदार यांच्या माध्यमातून कारवाई करत या बंधक करून ठेवलेल्या कामगारांची सुटका केली.सर्व कामगारांना आवश्यक प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी वाहतुकीची सोय करून देण्यात आली. 

अशी झाली कारवाई...

दाखल झालेल्या तक्रारीची दखल घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा विधी सेवा समिती, पुणे यांच्या वतीने एडवोकेट देवभक्त महापुरे, एडवोकेट सुनिल म्हस्के आणि दीपक पवार यांची समिती गठीत करण्यात आली. समितीतील सदस्य, स्थानिक महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, कामगार आयुक्तालयाचे प्रतिनिधी, मंडळ अधिकारी जयंत भोसले, ग्राम महसूल अधिकारी राहु, कामगार विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून कारवाई केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow