जबरी चोरी करणारा संशयित आरोपी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गजाआड

Nov 7, 2026 - 07:22
Nov 7, 2026 - 07:26
 0  5
जबरी चोरी करणारा संशयित आरोपी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून गजाआड

आय मिरर 

बारामती तालुक्यातील लाटे गावच्या हद्दीत जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला वडगाव निंबाळकर पोलिसांनी गजाआड केल आहे.शक्तीमान अविनाश उर्फ हनम्या काळे वय २५ वर्ष असं अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.या गुन्ह्यात एक विधिसंघर्षग्रस्त बालक आणि दोन फरार आरोपींचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपी कडून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लाटे गावचे हद्दीत जबरी चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती.वरिष्ठांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तात्काळ पथक नेमुन पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी व गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना केले. 

सदर गुन्हयातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहीतीच्या आधारे बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावचे हद्दीत शोध घेतला. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन एका दाखल गुन्हयातील निष्पन्न आरोपी आणि संशोध आरोपीच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी शक्तिमान अविनाश उर्फ हनुमान काळे राहणार माळेगाव खुर्द सध्या राहणार कांबळेश्वर याच्या घरात घरपोडी करण्यासाठी वापरलेले साहित्य मिळून आलं. 

त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेले दोन लाख तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात अटक आरोपी याच्यासह एक विधी संघर्ष ग्रस्त बालक आणि दोन फरारी आरोपी यांचाही समावेश असल्याचं निष्पन्न झाला आहे.यातील फरारी आरोपी ही सराईत गुन्हेगार आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अझर मुलांनी करत असून या तपासात आणखी गुन्ह्यांची उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी, पोलीस हवालदार अनिल खेडकर, कल्याण खांडेकर, हृदयनाथ देवकर, भाउसाहेब मारकड, पोलीस शिपाई आबा जाधव, धनंजय भोसले, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, नागनाथ परगे, विकास येटाळे, भानुदास सरक यांनी तसेच स्था.गु. शाखा यांचेकडील पोसई सुधीर वाळुंज, ग्रेड पोसई कारंडे, भोकरे, पोलीस अंमलदार निकम, तेलंग, होळकर, पाटील, अहिवळे, नाळे, स्वामी, डांगे यांनी मिळून केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow