Baramati तमाशाचा नाद,डोक्यावर कर्जाचा भार सोन्यावर पडली नजर अन् पैशांसाठी आखला गेला असा डाव

Oct 5, 2026 - 15:47
Oct 5, 2026 - 15:52
 0  160
Baramati तमाशाचा नाद,डोक्यावर कर्जाचा भार सोन्यावर पडली नजर अन् पैशांसाठी आखला गेला असा डाव

आय मिरर 

बारामतीच्या शेरेवाडीत घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे.चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपीने सोन्याचे दागिने लुटले...मात्र त्यानंतर दोन महिलांवर कुऱ्हाडीने वार करण्यात आले...आणि पाहता पाहता चोरीचा डाव रक्तरंजित हत्याकांडात बदलला !

पण हा डाव आखला कुणी? सोन्यावर नजर का पडली? आणि दोन महिलांना जीव गमवावा का लागला ?

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करताच तब्बल आठ तपास पथकं तयार केली. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तर दोनशेहून अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती तपासण्यात आली.

तपासाची चक्रं वेगाने फिरत असताना संशयाची सुई शेरेवाडीतीलच विकास ऊर्फ अप्पा राजेंद्र लडकत, वय २५ वर्षे, याच्यावर स्थिरावली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने दोन्ही महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याची आणि कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं समोर आलं आहे. चोरीला गेलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

या घटनेत इंदुमती मारुती लडकत आणि कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंगावरील तब्बल पाच तोळे, सुमारे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, तमाशाचा नाद... कर्जाचा भार... सोन्याची लालसा... चोरीचा डाव... कुऱ्हाडीचा घाव... आणि दोन जीवांचा अंत !

शेरेवाडीच्या या थरारक दुहेरी हत्याकांडाचा तपास आता पुढे सुरू असून, या गुन्ह्यामागे आणखी काही कारणं किंवा व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow