तो चोरी केलेलं साहित्य खरेदी करायचा ; बारामती पोलिसांनी केला गजाआड
आय मिरर
बारामती एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा बारामती तालुका पोलिसांनी छडा लावलाय या प्रकरणी एका भंगार व्यवसायिकासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे हा भंगार विक्रेता अल्पवयीन मुलांनी चोरी केलेल्या वस्तू खरेदी करत होता. मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी,राजू रामा दिवटे आणि संजय रामा दिवटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बारामती तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
चोरीचा माल त्यांनी भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय ३८) याला विकल्याचे निष्पन्न झाले.बारामती तालुका पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली असून, अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. एकूण १३ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत ३ मार्च रोजी एमआयडीसी परिसरातील हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून एकूण ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यामध्ये सुमारे २ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिकल केबल, ५० हजार रुपये किमतीचे पाण्याचे फिटिंग साहित्य, १५ हजार रुपये किमतीचा आरओ तसेच सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश आहे.
या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे यांना ५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ०२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे सुरू आहे.
दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर राहुल मखरे हे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस,अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे,किशोर वीर,राहुल मखरे,जितेंद्र शिंदे, मनोज पवार, राहुल लांडगे,सचिन तरंगे,आफरीन शेख यांनी केली आहे.
What's Your Reaction?