वालचंदनगर पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; या गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

Apr 14, 2026 - 19:05
Apr 14, 2026 - 19:19
 0  848
वालचंदनगर पोलिस अन् स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; या गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोटारसायकल चोरी सह जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत महेश ऊर्फ मावडया मंगेश काळे आणि पंकज गुरूपत पवार या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड केल आहे.

संबंधित आरोपींकडून पोलीस चौकशीत पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण हद्दीतील वालचंदनगर, जेजुरी, दौंड व करमाळा पोलीस ठाण्यांतील एकूण 06 गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून 05 चोरी केलेल्या दुचाकी 3 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 3 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

दोन्ही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपासवालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गेले काही दिवसांपासुन पुणे ग्रामीण जिल्हामध्ये दुचाकी वाहने, घरफोडी, जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी सूचना केल्या होत्या. 

त्याअनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन मधील चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी तपास पथकामधील अंमलदार यांना वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांची माहिती देवुन त्याप्रमाणे गोपनीय बातमीदार सर्तक करुन व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करणेबाबत आदेशीत केले होते.

त्याअनुषंगाने वालचंदनगर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हे मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांच्या अनुषंगाने तपास करत असताना तपास पथकामधील अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदार यांच्यामार्फतीने बातमी मिळाली की, मोटार सायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळीमधील महेश ऊर्फे मावडया मंगेश काळे व त्याचा साथिदार पंकज गुरूपत पवार यांनी गेले काही दिवसांपासुन त्यांच्या इतर साथिदारांसह वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येवून मोटार सायकल चोरी केल्या आहेत. 

महेश ऊर्फे मावडया मंगेश काळे व पंकज गुरूपत पवार रा. मांगी, ता. करमाळा, जि. सोलापुर हा इंदापुर बारामती रोडवरुन बारामतीच्या दिशेने येत आहे अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास पथकामधील अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेतला असता सदर दोन्ही आरोपी हे गोतंडी, ता. इंदापुर गावचे हद्दीमध्ये मिळून आले. 

सदर आरोपींकडे मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी पुणे ग्रामीण हद्दीमधील वालचंदनगर पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन, दौंड पोलीस स्टेशन तसेच सोलापुर ग्रामीण हद्दीमधील करमाळा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेले काही दिवसांपासुन वेळोवेळी मोटार सायकल, घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलीस चौकशीत आरोपींकडून सहा गुन्हे उघड झाले आहेत. 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुर्दशन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर, बाळासाहेब कारंडे, रविंद्र पाटमास, पोलीस हवालदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, किर्तीलाल गायकवाड, स्वप्नील अहिवळे, अभिजीत एकशिंगेख, निलेश शिंदे व पोलीस अंमलदार विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, रणजित देवकर यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow