मालोजीराजे भोसले गढी संवर्धन आरखाद्यास आजच्या आजच मिळणार तांत्रिक मान्यता ! अजितदादांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना;आमदार भरणेंची माहिती
आय मिरर(देवा राखुंडे)
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि.१० जानेवारी रोजी पुणे जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली. यावेळी माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडे इंदापूर शहरातील ऐतिहासिक वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांच्या गढीच्या संवर्धन व जतन आरखाद्यास तांत्रिक मान्यता देण्याची विनंती केली.
या नंतर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्वरित जिल्हाधिकारी यांना तांत्रिक मान्यता देऊन निविदा करण्यासंदर्भाच्या सूचना केल्या.यावर जिल्हाधिकारी यांनी आजच निविदा तयार करणार असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले असून आजच ही निविदा प्रक्रिया काढली जाणार असल्याचं आमदार भरणे यांनी सांगितले आहे.
तसेच आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील शाळांमधील वर्ग खोल्याच्या दुरवस्था बाबत पालकमंत्री अजित पवार यांच लक्ष वेधून वर्ग खोल्या दुरुस्ती करण्यासाठीची ही मागणी केली आहे.
What's Your Reaction?