नदीत सूर मारला, पण पाण्याचा अंदाज चुकला, ऐन नवरात्रीत चौघं बुडाली

Sep 29, 2025 - 17:41
 0  867
नदीत सूर मारला, पण पाण्याचा अंदाज चुकला, ऐन नवरात्रीत चौघं बुडाली

आय मिरर 

मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील दोन घटनांमध्ये चौघं जण बुडाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील एकाचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे नळगंगा व्याघ्र नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांसह एकूण चौघे जण बुडाले.

मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील शुभम दवंगे (१६) आणि सोहम सोनोने (१५) ही दोन मुलं शिवणी रस्त्यावरील निंबोळी गावानजीक व्याघ्रा नदीपात्रात बुडाली. यातील शुभमचा मृतदेह सापडला असून सोहमचा शोध सुरू आहे. हे दोघेही पोहण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येत आहे.

पाच अल्पवयीन मुलं केशवा मंदिराजवळील बंधाऱ्यासमोर नळगंगा नदीतील डोहात पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघं बुडाल्याचं पाहून काठावर असेलली तिघं गावात मदत मागायला गेली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

दुसरीकडे, नादुरा तालुक्यातील निमगाव येथील करण भोंबळे (१८) व वैभव फुके (२२) हे दोघे ज्ञानगंगा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेले होते. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. त्यांचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे निमगाव आणि परिसरात शोकळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयवंत सातव, निमगावचे सरपंच विकास इंगळे, पोलीस पाटील, तलाठी, ओम साई फाउंडेशनचे सदस्य तसेच मानेगाव येथील बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow