अहिल्यानगरमध्ये राडा, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

Sep 29, 2025 - 17:37
 0  591
अहिल्यानगरमध्ये राडा, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?

आय मिरर 

अहिल्यानगर शहरातील दुर्गामाता दौड दरम्यान काढलेल्या कथित आक्षेपार्ह रांगोळीत "आय लव मोहम्मद" असा उल्लेख आढळल्याने वादाला तोंड फुटलं आहे. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असली तरी मुस्लिम समाजाने संताप व्यक्त केला. परिणामी छत्रपती संभाजी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

अहिल्यानगर मधील कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लीम समाजाकडून कोटला गावात आंदोलन करण्यात आले होते.यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे.दरम्यान, आंदोलन करताना दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या ३० ते ३५ जणांनाही ताब्यात घेतले आहे. 

मुस्लीम धर्मगुरूचे नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखवल्या. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे नगरमधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपिला ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धार्मियांच्या भावना दुखवल्या प्रकरणी मुस्लिम समाजाचं रास्ता रोको आंदोलन सुरु होतं. अहिल्यानगर - संभाजीनगर महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

अहिल्यानगरमध्ये नेमकं काय झालं?

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारा तोटी कारंजासमोर काही समाजकंटकानी मुस्लीम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला. नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं. कुणीही अफवांवर वर विश्वास ठेवणे पोलिसांनी आवाहन केले. 

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी काय सांगितलं?

"दुर्गामाता दौड दरम्यान काढलेल्या आक्षेपार्ह रांगोळीवरून मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झाला. ही आक्षेपार्ह रांगोळी काढणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, आंदोलनादरम्यान जमाव संपूर्ण शहराकडे वळण्याचा प्रयत्न करत होता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून लाठीचा वापर करावा लागला," असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow