नोंद असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार सरसकट नाही,ओबीसींचे अहित होऊ देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

Sep 7, 2025 - 18:41
Sep 7, 2025 - 18:42
 0  180
नोंद असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार सरसकट नाही,ओबीसींचे अहित होऊ देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही

आय मिरर

परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचे अहित होणार नाही याला प्राधान्य दिलं आणि तसा निर्णय केला.ज्याच्याकडे नोंद असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार आहे सरसकट सर्टिफिकेट नाही.नोंद असलेल्यांनाच सर्टिफिकेट सोपी कार्यपद्धती आपण केली आहे.खरी नोंद असलेला व्यक्ती वंचित राहणार नाही त्याला त्याचा फायदा होणार आहे पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातील कुठलंही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही.या निर्णयामुळे मराठा समाजाचे हित झालं आहे पण ओबीसी समाजाचे बिलकुल अहित आम्ही होऊ दिलं नाही,काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही. असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी संबोधन करताना ते बोलत होते. 

फडणवीस म्हणाले की,मराठवाड्यात इंग्रजांचं शासन नव्हतं निजामांच होत, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे असेल तर इंग्रजांची रेकॉर्ड नाहीत, महाराष्ट्राच्या सर्व इतर भागात जातीचे प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रज रेकॉर्ड उपलब्ध आहे तो रेकॉर्ड काढतो त्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळते पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं. कारण मराठवाड्याचे सर्व रेकॉर्ड हैदराबाद गॅझेट मध्ये होते म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाहीत म्हणून हैदराबादचे गॅझेट मधील रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे.

ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय करणार हे सरकार आहे वेगवेगळी 18 महामंडळ तयार करणारे सरकार आहे.आम्हालाही माहिती आहे जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या अठरापगड जातींना आम्ही मुख्यधारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही.

आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाच काढून दुसऱ्याला द्यायचं नाही, दोन समाजाला भिडवायचं नाही. इंग्रजांची नीती हीच होती आपल्या समाजाला एकमेकांशी झुंजवत ठेवलं,समाजाला विभाजित ठेवलं म्हणून इंग्रजांनी राज्य केलं.आपल्याला सर्वांना सोबत घेऊन राज्य करायच आहे.याचं काढायचं त्याला द्यायचं हे नीती आमची नाही.

ओबीसींचा विकास उद्धार म्हणजे शिवकार्य आहे, ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधी थांबणार नाही.आम्ही दबावापोटी काम करत नाही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो.कुठलाही समाज मागणी घेऊन आल्यानंतर त्यांच्या योग्य मागण्या पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार यापुढेही करेल.

समाजाच्या मागण्या कधीही संपत नसतात एक संपली की दुसरी मागणी करायची असते तुम्ही मागत रहा आम्ही देत राहू आम्ही का देऊ तर तुम्ही आम्हाला निवडून दिल म्हणून देऊ शकतो आम्ही काय आमच्या पदरचं खिशातील देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला जे तुमचं आहे ते देण्याच काम करत आहोत जेवढी क्षमता आहे तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने चालले त्याच मार्गाने अठरापगड जातींना घेऊन चालू असेही फडणवीस यांनी नमूद केलं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow