इंदापूरचा तीन वेळा आमदार होणं इतकं सोपं नसतं : मंत्री दत्तात्रय भरणे
आय मिरर
इंदापूरचा तीन वेळा आमदार होणं इतकं सोपं नसतं, त्यामध्ये तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचा फार मोठा वाटा आहे असं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटल आहे.
या संदर्भातील दाखला देताना मंत्र भरणी म्हणाले की,बावडा भागातील एक टिंब टिंब पेशंट होता त्याने टिंब टिंब ला फोन केला, पण टिंब टिंब कडून चुकून तो फोन उचलला गेला नसेल. पण त्या टिंब टिंब चा फोन मला आला.रुग्णाच्या नातेवाईकांनी वडील आजारी आहेत मामा मदत करता आली तर करा असं सांगितलं. तात्काळ मी त्याला मदत केली आणि त्या रुग्णाला पुण्यात उपचार मिळाले.
त्या टिंब टिंब पेशंटने मला कधीही मतदान केलं नव्हतं. 2024 च्या निवडणुकीमध्ये त्या टिंब टिंब व्यक्तीच्या दारात मतांसाठी माणसं गेली त्यावेळी त्या टिंब टिंब व्यक्तीने त्या टिंब टिंब नेत्यांना सांगितलं की आम्ही दवाखान्यात असताना आम्हाला मदत केली फक्त भरणे मामांनी,त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करणार नाही.
त्यामुळे कसा कधी कुठला फायदा होईल हे सांगता येत नाही.नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जीव ओतून काम करा लोकांना मदत करा, रुग्णाला आधार द्या चांगल्या प्रकारच संबोधन करा. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद येतो असं मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे.
आज मी मंत्री आहे माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी केलं पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत सर्व शासकीय दवाखाने किंवा जिल्हा परिषदेचे दवाखाने त्यातून लोकांना कशी मदत होईल ते प्रयत्न आपण सर्वांनी केले पाहिजे.
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये पिसाळलेला कुत्रा चावला तर जखमी मध्ये दिली जाणारी लस उपलब्ध नाही. पण त्याबाबतीतही आपण भविष्यात काळजी घेऊ. लस उपलब्ध करून दिली जाईल. रुग्णांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही याची काळजी आपण घेत आहोत.
इंदापूर तालुक्यामध्ये डेंगू होऊच नये यासाठी मोहीम राबवली यामुळे खूप डेंगूचे प्रमाण कमी झाले आहे.गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाची नोंद हा तालुक्यातील सर्वसामान्य गरीब माणूस घेत असतो.
आज मी राज्याचा मंत्री आहे.मला आमदार असल्यापासून आवड आहे.2014 साली मला ज्यावेळी विचारलं तुम्हाला कुठली कमिटी पाहिजे त्यावेळी दिलीप वळसे पाटील आमचे समन्वयक होते मी त्यांना सांगितले मला आरोग्याची कमिटी द्या.जिथे मला रुग्णांना गोरगरिबांना मदत करता येईल 2014 पासून त्या कमिटीत काम करताना मला जो आनंद मिळाला. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मी स्वतःची माणसे आरोग्य सेवेसाठी ठेवली आहेत.
गरजू रुग्णांना कशी मदत होईल कोणत्या योजनेमध्ये तो बसेल यासाठी माझा प्रयत्न असतो. कदाचित दहा-वीस लाख रुपयाचे त्याचे उपचार मोफत करण्याचा माझा प्रयत्न असतो. सर्व शंभर टक्के होईल असं नाही पण बऱ्यापैकी त्याला मदत कशी होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो.
What's Your Reaction?