आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पायात साखळदंड बांधून विवाहितेला घरात कोंडले

Feb 4, 2025 - 09:05
 0  687
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून पायात साखळदंड बांधून विवाहितेला घरात कोंडले

जालना : आय मिरर

मुलीने आंतरजातीय विवाह केल्या नंतर मुलगी माहेरी आल्यावर आई-वडीलांनी तिच्या पायाला साखळदंड बांधुन कोंडून ठेवल्याची घटना भोकरदन शहरातील आलापूर मध्ये घडली आहे. पतीने छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात पत्नीला सोडविण्यासाठी धाव घेतल्याने हा प्रकार समोर आला.न्यायालयाच्या आदेशानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहीतेची आलापुर या गावातुन सुटका करत विवाहित महिलेला तिच्या पतीच्या स्वाधीन केले आहे.

भोकरदन शहरालगत असलेल्या आलापुर येथील खालिद शहा सिकंदर शहा यांची मुलगी शहनाज उर्फ सोनल हिचे कुटुंबीय छत्रपती संभाजी नगर येथील मिसाळवाडी येथे राहत असताना तेथील सागर संजय ढगे या मुलासोबत तिने आंतरजातीय विवाह केला होता.मुलीने हा विवाह केल्या नंतर शहा कुटुंबीय भोकरदन शहराला लागून असलेल्या आलापुर येथे मूळ गावी राहण्यासाठी गेले होते.

विवाहानंतर शहनाज हिला तीन वर्षाचा कार्तिक हा मुलगा ही झाला. साधारणतः दोन महिन्यापूर्वी शहनाज हिच्या मोठ्या बहिणीची प्रसूती झाल्याने तिचे बाळ बघण्यासाठी शहनाज हिला तिच्या आईने आलापुर येथे बोलावले. शहनाज तिचा पती सागर व मुलगा कार्तीक यास घेउन आलापुर येथे गेली असता तिच्या आई वडीलांनी शहनाज व तिचा मुलगा कार्तिक यास घरात डांबुन ठेवत पती सागर याला घरातून हाकलून दिले. 

यानंतर 7 डिसेंबर रोजी सागर पुन्हा त्याच्या पत्नीला घेण्यासाठी गेला असता तुझा व आमचा धर्म वेगळा असून आम्ही शहनाज हीचे आमच्या धर्मात पुन्हा दुसरे लग्न लावून देणार आहोत असे सांगत शहनाज यांच्या घरच्या लोकांनी सागर याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन हाकलून दिले. यानंतर 24 डिसेंबर रोजी शहनाज च्या बहिणीने सागर यास फोन करून सांगितले की शहनाज व तिच्या मुलाला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने घरात डांबून ठेवले असून त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यानंतर सागर याने छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपिठात धाव घेत न्यायालयाकडे पत्नीची व मुलाची सुटका करण्याची विनंती केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने भोकरदन पोलिसांना शहनाज व तिच्या मुलाची सुटका करण्याचे आदेश दिले. 

त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी उपनिरीक्षक बी.टी. सहाने व महिला कर्मचारी सीमा देठे यांना आलापूर येथील खालेद शहा यांच्या घरी पाठवले. मात्र त्यांना शहनाज हिच्या आईने कोणताही थारा लागू दिला नाही.या प्रकरणाची भोकरदन पोलिसांना मुळात कल्पना नव्हती मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेऊन आदेश दिल्याने हे प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले. मात्र खालिद शहा यांच्या कुटुंबाचा फारसा कोणाशी संबंध नसल्याने व ते मनोरुग्ण असल्यासारखे वागत असल्याने या कुटुंबाविषयी अथवा शहनाज विषयी कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती मात्र गोपनीय पद्धतीने माहिती जमा करून पोलिसांनी शेवटी काहीशा संघर्षाला तोंड देत साखळ दंडातून या शहनाज व कार्तिक यांची सुटका केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow