पावसाळ्यात छत्र्या उगवल्यागत काही जण निवडणुकीत उगवतात : उपमुख्यमंत्री अजित पवार
आय मिरर
पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं काही जण निवडणुकीत उगवतात, निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का ? कधी तुमच्या सुख दुःखात आली का? याचा विचार करा.ही निवडणूक केवळ मतांची लढाई नाही ही दोन्ही शहराच्या विकासाची चाचणी आहे.राज्यात 288 ठिकाणी नगराध्यक्ष थेट निवडला जाणार आहे,रुसवे फुगवे गट तट बाजूला ठेवा. मी जो नगराध्यक्ष तो आपल्याला निवडून आणायचा आहे. असा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केल आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती मध्ये बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायत निवडणुकीकरिता इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या यानंतर कार्यकर्ता मेळाव्याला अजित पवार संबोधन करत होते.
अजित पवार म्हणाले की,आपण जेव्हा एक दिलाने निवडणुकीला उभा राहतो तेव्हा आपल्याला कोणतीही ताकद हरवू शकत नाही, कोण माईचा लाल हरवू शकत नाही.आपल्यात जर कुठे गडबड झाली तर अडचण येते.आता निवडणुकीच्या निमित्ताने अनेकजण बोलणारे येथील पण काम करणारा फक्त अजितदादा असतो.
मी काम करतोय माझं काम बोलतोय, काही लोक चुकीच्या गोष्टी करायला लागली की मी विचार करतो एवढं काम दुसरा कुठल्या तालुक्यात केलं असतं तर डोक्यांवर उचलून घेतलं असतं.माझ्यावर टाकलेला विश्वास कधीही खोटा ठरवू शकणार नाही. अशा प्रकारचा शब्द या मेळाव्याच्या निमित्ताने देतो.विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत याची ग्वाही देतो.
घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं...
एक नाही आणि अर्ध नाही किंवा पाव देखील नाही, घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं.तुम्ही जेवढे मला बारामतीला निवडून द्याल तेवढी माझी जिल्ह्यात मान वाढणार आहे.माळेगाव ला सुद्धा एक रोल मॉडेल नगरपंचायत कशी असू शकते अशा पद्धतीने माळेगाव नगरपंचायतीचा चेहरा मोहरा राज्यात बदलायचा आहे.आता काही झाले तरी माळेगावकरांच्या कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या मदतीने आपण माळेगावला उद्याच्या पाच वर्षात रोल मॉडेल नगरपंचायत बनवायचं आहे.आपली एवढी धमक आहे आपण जे बोलतो ते करतो. आपल्या मनगटांमध्ये ती ताकद आहे करायची, मी त्या उद्योगपतींना सांगू शकतो आता देखील मी सीएसआरचा निधी आणला आहे.
कोणतेही काम करताना इच्छाशक्ती फार महत्त्वाचे असते.आपल्याला राजकारण बाजूला ठेवून एकत्र राहायचं आहे विकासाचा राजकारण करायचे आहे. कामे चांगली केली तर लोकांचे मत परिवर्तन होतं.राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या चांगल्या योजना येत आहेत.पंतप्रधान असतील नितीन गडकरी असतील अमित शहा असतील यांना भेटेल, शहराच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी आणेल.
मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत...
आता लोकसभेला असं झालं तसं झालं हे सांगत बसू नका, शेवटी हे सगळे आपलेच मतदार आहेत.एका बाजूला पवार साहेब एका बाजूला मी होतो बारामतीकरांच्या पुढे प्रश्न राहणारच ना. का काहींचं प्रेम साहेबांवर नसावं ? असलं पाहिजे माझही प्रेम आहेच ना ! पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्यामुळे इतकं बारीक बघणं फार चुकीच आहे. अरे जरा दिलदार पणा वाढवा ना ! मोठेपणा वाढवा ना ! मनाचा मोठेपणा करा. आपण कालपर्यंत एकत्र होतो ना ? मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना ? मी काय वरून टपकलो व्हय...हे कसं आपल्याला विसरता येईल.
भाषण दरम्यान अजित पवारांना एक चिठ्ठी आली.त्यात बारामती तालुक्याच्या बाहेरील गुंड लोक जे बारामती एमआयडीसी मधील आहेत त्यांची गुन्हेगारी वाढत चालली आहे असं लिहिलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले मी या संदर्भात माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो हे अजिबात चालणार नाही.
तुम्ही फार संकुचित विचाराचे राहू नका. बारामतीकरांनी माळेगाव कारखान्याला आमदारकीला साथ दिली. बदल झाला ना. मला खासदारकीला ४८ हजार मतं कमी पडली मग मी म्हटलो का मला आता मत दिलं नाही मी आता याचं बघतोच मग एक लाख मत कशी झाली असती. मित्रांनो तसं नसतं काही काही माणसं जोडायची असतात. काहींचं थोडं चुकलं असेल तर त्यांना मुख्य प्रवाहात आणू.झालं गेलं गंगेला मिळालं, आपल्याला खूप पुढे जायचं आहे फार काही त्या गोष्टीचा विचार करू नका.
एकदा चित्र स्पष्ट झालं की प्रचाराचा नारळ फोडेल, काही सांगायचे ते माळेगावकर आणि बारामतीकरांना सांगेन.त्यानंतर हेवे दावे गट तट, काहीजण एवढं उथ मातपणे बोलत आहेत, घमंड करत आहेत. त्यांचं त्यांना लखलाभ.असं म्हणत बारामती नगराध्यक्ष धरून सर्व नगरसेवक निवडून येतील हे आपण बघु अस आवाहन यावेळी अजित पवारांनी केले.
What's Your Reaction?