तर आम्हीही पक्षाला कोलू ! जिल्हाध्यक्ष गारटकरांचा दादांसह मामांना इशारा
आय मिरर
इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेज प्रसंग निर्माण झालाय. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात घेऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी देण्यास जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर समर्थकांनी प्रचंड विरोध दर्शवला आहे.
जर पक्षाने गारटकर समर्थक विरोधी भूमिका घेतली तर मात्र इंदापूर मध्ये प्रदीप गारटकर आपल्या पदाचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.
काल बुधवारी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत या संदर्भात झालेल्या चर्चेनंतर सायंकाळी इंदापूर शहरातील गारटकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याने या सभेमध्ये गारडकर प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ,जर पक्षाने आमचं ऐकलं,योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशाराच इंदापुरातून जिल्हाध्यक्ष गारटकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह इंदापूरचे आमदार राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे.
आम्ही आमदार केल्यामुळे तुम्ही मंत्री झालात...
इंदापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटात जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर मोठ बंड करण्याच्या तयारीत आहेत.त्यांनी राजीनाम्याची तयारी ही दर्शवली आहे.यासोबत कोण म्हणत असेल इंदापूरच्या विकासाला पैसे आम्ही दिले परंतु तुम्हाला आम्ही आमदार केलं, आम्ही आमदार केल्यामुळे तुम्ही मंत्री झालात जर तुम्हाला आम्ही आमदारच केलं नसतं तर इंदापूरच्या विकासाला पैसे आले असते का ? हा साधा हिशोब आहे.असा हल्लाबोल ही जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी मंत्री भरणे यांच्यावर केला आहे. कोणाला भीक घालू नका असं आवाहन गारटकर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
What's Your Reaction?