पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवारांच्या विचाराचाच अध्यक्ष : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दावा
आय मिरर
पुणे जिल्हा परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विचारांचाच अध्यक्ष होईल असा दावा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्याच्या इंदापुरमध्ये केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभाजन झालं असलं तरी पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या विचाराचाच होईल हे कोणाला सांगायची गरज नाही असं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये म्हटलं आहे.
पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सध्या सर्वसाधारण गटासाठी आरक्षण आहे. मागील वेळेस हे पद सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी राखीव होते. राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी युती करा जिथे शक्य नसेल तिथे स्वबळावर लढा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवरती कोणाच्या विचाराचा अध्यक्ष बसणार याची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागलेली आहे.
अशातच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर भाष्य केलं आहे. पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या विचाराचाच होईल हे कोणाला सांगायची गरज नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
पूर्वीपासूनच पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल आहे. पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ग्राउंड पीच म्हणून ओळखला जातो. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यात मोठी ताकद असून याच राजकीय ताकतीच्या जोरावर काका पुतण्यांनी पुणे जिल्ह्यावरती आपली कमांड ठेवली. मात्र मागील काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट झाली आणि एका राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले.सध्या मूळ चिन्ह आणि पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे तर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केली आणि नवीन चिन्ह घेऊन नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या. यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला चांगलं यश आलं मात्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला शिवाय महाविकास आघाडीला मोठा फटका बसला.
यानंतर आता नगरपरिषदा महानगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका पार पडत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडल्या होत्या.आता त्या पार पडत आहेत त्यामुळे या निवडुकीत कोणाच्या पारड्यात कौल पडणार, कोण सत्ता राखणार आणि कोण नव्याने सत्तांतर करून प्रस्थापितांना धक्का देणार हे पाहणं महत्त्वाचा असेल.
What's Your Reaction?