इंदापुरात स्कार्पिओ आणि दुचाकीचा अपघात ; स्कार्पिओ मध्ये चंदनाची लाकडं ? पोलिसांकडून तपास सुरू 

Oct 21, 2025 - 10:09
Oct 21, 2025 - 10:10
 0  1267
इंदापुरात स्कार्पिओ आणि दुचाकीचा अपघात ; स्कार्पिओ मध्ये चंदनाची लाकडं ? पोलिसांकडून तपास सुरू 

आय मिरर 

सोमवारी दि.20 ऑक्टोंबर रोजी रात्री उशिरा इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव पाटीवरस्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अपघात झाला आहे.यात दुचाकीवरील प्रवासी संजय तुकाराम काळे आणि त्यांची पत्नी सविता संजय काळे हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींवर इंदापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. 

घटनास्थळी अपघातग्रस्त काळया रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड होते अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून इंदापूर पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बाभुळगाव पाठीवरती अपघात घडल्यानंतर या काळया रंगाच्या स्कार्पिओ गाडीने पळ काढला मात्र पुढे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव गावच्या हद्दीत गाडीचा पुढील टायर फुटला मग ही गाडी रस्त्याला थांबवण्यात गाडीतील चालक आणि इतर व्यक्ती या फरार झाल्या.

अपघातग्रस्त वाहनात चंदनाचे लाकूड कोठून आले ? हे चंदन तस्करांचे वाहन होते का ? या सर्व प्रकरणाचा आता इंदापूर पोलिसांना तपास करावा लागणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow