ब्रेकिंग ! जेवण बनवण्याच्या कारणातून इंदापुरात कोयत्याने वार करून एकाचा खून
आय मिरर
इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे जेवण बनवण्याच्या कारणावरुन एका शेतमजुराने दुसऱ्या शेतमजुराचा डोक्यात कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शुभम लालजी भारतीय वय 35 वर्ष असं खून झालेल्या शेतमजूराचे नांव आहे.भारतीय हा उत्तरप्रदेशमधील इलाहाबाद जिल्ह्यातील मेजाखास तालुक्यातील लेडडी गावचा रहिवाशी आहे. तर आरोपी नीरजकुमार लालमणी कुशवाह हा देखील त्याच गावचा रहिवाशी आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक देखील केली आहे.इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील बेडशिंग येथे मिलिंद जीवनधर दोशी यांची बारा एकर जमीन आहे.फिर्यादी निलेश मारूती जांभळकर वय 32 वर्ष रा. राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर यांनीही जमीन वाट्याने करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेतीत काम करण्यासाठी किसनकुमार रमेशकुमार कुशवाह, नीरजकुमार लालमनी कुशवाह, मनीष लालमनी कुशवाह आणि शुभम लालजी भारतीय या हे उत्तर प्रदेश मधील कामगार या ठिकाणी काम करत होते.
दरम्यान शनिवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी जेवण बनवण्यावरून नीरजकुमार कुशवाह आणि शुभम भारतीय यांच्यात वाद झाला होता. दरम्यान हा वाद जांभळकर यांनी मिटवला होता. त्यानंतर सायंकाळी रात्री उशिरा नेहमीप्रमाणे हे सर्वजण कामावरून घरी आले. त्यानंतर गावात सुरू असलेल्या मारुती महादेवाच्या मंदिरातील भंडाऱ्याचा त्यांनी आस्वाद घेतला. मात्र रात्री उशीरा साडेबारा वाजता घराच्या स्लॅप वर जांभळकर यांना जोरजोराने ओरडल्याचा आवाज आला. जांभळकर यांनी तात्काळ वरती जाऊन पाहिले असता नीरजकुमार कुशवाह हा कोयत्याने शुभम भारतीय याच्यावरती वार करत होता. यानंतर जांभळकर यांनी इतर कामगारांच्या मदतीने जखमी झालेल्या शुभम भारतीय याला इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले.
What's Your Reaction?