इंदापूरच्या रेडा येथील देवकर वस्तीवर घरफोडी ! लाखोंचा ऐवज लुटला,चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

Dec 30, 2025 - 07:32
Dec 30, 2025 - 07:35
 0  2328
इंदापूरच्या रेडा येथील देवकर वस्तीवर घरफोडी ! लाखोंचा ऐवज लुटला,चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

आय मिरर 

इंदापूर तालुक्यातील रेडा येथील देवकर वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमाराला तीन अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून रोख रकमेसह तब्बल पाच लाख हून अधिक किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी केलेत. राजेंद्र गोरख देवकर यांच्या घरी ही घरफोडीची घटना घडली असून हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. निरा नरसिंहपुर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून घरातील महिलांना कोयत्याचा धाक दाखवला. सोन्या चांदीचा ऐवज आणि पैसा कुठे आहे याची विचारणा केली.

घाबरलेल्या महिलांनी या अज्ञात चोरट्यांना कपाटाची चावी ठेवलेली जागा दाखवली. त्यानंतर या अज्ञात चोरट्याने 45 हजार रोख रकमेसह पाच लाख 24 हजार रुपयाचे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केला आणि फरार झाले.

या घटनेनंतर निरा नरसिंहपुर पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow