Dound पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहिले अंगावर वीज कोसळली शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Jun 14, 2025 - 07:05
 0  1190
Dound पावसात रस्त्याच्या कडेला उभे राहिले अंगावर वीज कोसळली शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

आय मिरर 

पुण्याच्या दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मगरमळा परिसरात संजय जगन्नाथ जगताप या 55 वर्षीय शेतकऱ्याचा अंगावरती वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

रस्त्यात अचानक पाऊस लागल्यामुळे पावसापासून संरक्षणासाठी जगताप हे अंगावरती प्लास्टिकचा कागद घेऊन रस्त्याच्या कडेला उभा राहिले होते.इतक्यात त्यांच्या अंगावर वीज कोसळली गेली अशी माहिती समोर येत आहे.

जगताप यांच्या शेतामध्ये फ्लॉवर पिकाची तोडणी सुरू होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शेतातील काम आटोपून जगताप आपल्या मुलांना दुचाकीवरून सोडायला गेले होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow