शेतकऱ्यांचा विश्वास हीच सोमेश्वर कारखान्याची खरी ताकद – जय पवार

Nov 5, 2026 - 16:59
Nov 5, 2026 - 17:00
 0  30
शेतकऱ्यांचा विश्वास हीच सोमेश्वर कारखान्याची खरी ताकद – जय पवार

आय मिरर 

दिवंगत लोकनेते अजित पवार यांनी जिवापाड जपलेला, आपल्या कष्टातून उभा केलेला आणि शेतकऱ्यांचे हित नेहमीच केंद्रस्थानी ठेवलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांचा विश्वास हीच सोमेश्वर कारखान्याची खरी ताकद असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी केले.या कारखान्याच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीच्या वेळी आज जय पवार बोलत होते.

यावेळी नवनिर्वाचित चेअरमन राजवर्धन शिंदे आणि व्हाईस चेअरमन संग्राम सोरटे यांचे जय पवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यानंतर त्यांनी कारखान्याच्या संचालक मंडळातील सहकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. कारखान्याची भविष्यातील वाटचाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, सभासदांचे हित आणि कारखान्याच्या सर्वांगीण प्रगतीबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

दिवंगत अजितदादांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीसाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. त्यांनी जपलेला सहकाराचा हा समृद्ध वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेणे, शेतकऱ्यांचा विश्वास कायम राखणे आणि सोमेश्वर कारखान्याची प्रतिष्ठा अधिक उंचावेल असे काम करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

दिवंगत अजितदादांचे स्वप्न, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार आणि खासदार पार्थ पवार यांचे मार्गदर्शन तसेच सर्व संचालक, सभासद, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांची एकजूट यांच्या बळावर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निश्चितच प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी जय पवार यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow