इंदापूर तालुक्यातील युवक युवतींची विचारधारा डेव्हलपमेंट दिशेने : राहुल गुंडेकर

Oct 29, 2026 - 06:48
Oct 29, 2026 - 07:14
 0  2
इंदापूर तालुक्यातील युवक युवतींची विचारधारा डेव्हलपमेंट दिशेने : राहुल गुंडेकर

आय मिरर 

पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर या पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पैशांचा जोरदार पाऊस झाला पण पदवीधर त्याला गाफील न राहता योग्य उमेदवारास चांगली मोठी संधी निर्माण करून देऊन इंदापूर तालुक्यातील युवक युवतींनी त्यांची विचारधारा ही डेव्हलपमेंट दिशेने असल्याचे स्पष्ट केले असे मत इंदापूरचे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि युवा नेते राहुल गुंडेकर यांनी व्यक्त केले.

नुकताच तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघ अशा पाच जागांचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे स्वप्न होते, मात्र ते धुळीस मिळालं. महाविकास आघाडीला पाच पैकी तीन जागा मिळाल्या तर महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावा लागलं. ही गोकुळचीच पुनरावृत्ती म्हणावी लागेल असेही गुंडेकर म्हणाले.

सध्या राज्यात आपण सर्व घडामोडी पाहत असताना त्यामधील विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल, दिल्लीचे आंदोलन असेल त्याचबरोबर आरक्षण चा लढा असेल, एवढेच नव्हे तर इंदापूर तालुक्यातील उजनी धरण परिसरात सरकारकडून प्रस्थापित असणारे AI डेटा सेंटर विरुद्ध पुकारलेलं आंदोलन असेल सर्व शेतकरी मैदानात उतरलेले आपण पाहत आहोत.

अगदी कर्जत तालुक्यात होणारा टोरांटो प्रकल्पाचा विरोध असेल हे सर्व सिस्टीमच्या विरुद्ध चालू आहे.बदल हा होत असतो त्याला योग्य वेळ येणे गरजेचे असते, त्याची सुरुवात गोकुळ चा निकाल असो अगर कालचा या पाच जागांचा निकाल असो यातून आपल्याला राज्यात पहायला मिळत आहे.

राजकारणात बदल होत असतात,आणि ते अभिप्रेत आहेत.सॉफ्टवेअर बनतो हॅक होतो, मशनरी बनती कंट्रोलिंग होती. अगदी तसंच काहीसं ईव्हीएम च्या बाबतीत म्हणता येईल.कारण झालेल्या या निवडणुका बॅलेट पेपर वरती झाल्या आणि निकाल अगदी स्पष्ट आहे.म्हणूनच बॅलेट पेपर वरील मतदान हा ईव्हीएम विरोधातील विजय म्हणावा लागेल.

पदवीधर विकले गेले नाहीत..!

या निवडणुकीत पैशाचा मोठा घोडेबाजार झाला.अगदी डोळे फिरविणारे आकडे कानी पडत होते.एक एक मत हजारोंच्या किमतीत विकले गेले.पण ज्यांच्या कडे उद्याच्या उज्वल भारताचं भविष्य म्हणून पाहिल जात ती सुशिक्षित पदवीधरांची पिढी मात्र विकली गेली नाही.त्यांना मताची किंमत समजली,हा बदल म्हणजे उद्याच्या राजकारणातील परिवर्तनाची नांदी आहे.शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या हर्षदा देशमुख जाधव यांची आमदार म्हणून झालेली निवड सार्थ असून पदवीधरांसाठी व सामान्य जनतेसाठी कामांच्या हालचालीसाठी मोठा वेग पहावयास मिळणार आहे.

बदल तेव्हाच होतो जेव्हा गरजेचा असतो आणि बदल हा कामे मार्गी लागण्यासाठी होतो.म्हणून यापुढे हर्षदा देशमुख जाधव यांनी देखील मोठ्या प्रमाणात पदवीधर व सामान्य लोकांसाठी काम करावे. इंदापूर तालुक्यासह राज्यातील सर्व युवक युवतींचे अनेक प्रश्न असतील रोजगार, डेव्हलपमेंट, ग्रामीण भागातील महिलांसाठी न्यूली स्किल प्लॅटफॉर्म याकडे लक्ष द्यावे. तरुणांना सहकार्य करून यंत्रणा देखील कामाला लावावी एवढीच आमची मतदार म्हणून अपेक्षा..!

पश्चिम महाराष्ट्राची स्वाभिमानी पदवीधर आमदार हर्षदा देशमुख जाधव यांचे एक पदवीधर मतदार म्हणून हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो.

Hon.Harshdha Deshmukh Jadhav Now Its MLA HON.HARSHDHA DESHMUKH JADHAV ! ( Graduates Knows System Well )

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow