शिर्डी साईचरणी कोट्यवधींचा नजराणा..! भक्ताकडून तब्बल १ कोटी १६ लाखांचा सोन्याचा हार अर्पण

Nov 27, 2026 - 07:14
Nov 27, 2026 - 07:16
 0  15
शिर्डी साईचरणी कोट्यवधींचा नजराणा..! भक्ताकडून तब्बल १ कोटी १६ लाखांचा सोन्याचा हार अर्पण

आय मिरर 

शिर्डीच्या साईदरबारात भक्तीचा अनोखा नजराणा अर्पण करण्यात आला आहे.मुंबईहून आलेल्या एका साईभक्ताने साईबाबांच्या चरणी तब्बल एक किलो वजनाचा सोन्याचा हार अर्पण केला आहे. विशेष म्हणजे या हाराची किंमत तब्बल १ कोटी १६ लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतं आहे.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मुंबईच्या भक्ताने अर्पण केलेला हा सोन्याचा हार अत्यंत आकर्षक आणि कलाकुसरीने बनवण्यात आला.या हारामध्ये सोन्यासोबतच मौल्यवान हिरे आणि रत्न जडवण्यात आले असून, त्यावर ‘ॐ’ची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे.मंदिरात यापूर्वी अर्पण करण्यात आलेल्या सोन्याच्या हारांपेक्षा या हाराची रचना वेगळी असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, मध्याह्न आरतीच्या वेळी हा सोन्याचा हार साईबाबांच्या मूर्तीला परिधान करण्यात आला आहे.विशेष म्हणजे दोन्ही साईभक्तांनी आपली ओळख गोपनीय ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.त्यामुळे साईदरबारात पुन्हा एकदा भक्ती आणि श्रद्धेचा अनमोल नजराणा पाहायला मिळाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow