Breaking इंदापुरात डाळज जवळ स्टेअरिंग राॅड तुटल्याने रुग्णवाहिका पलटली ! चार वाहनांचा अपघात, सात जण थोडक्यात…
आय मिरर(निलेश मोरे)
इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर एक च्या पूलाजवळ पुण्यातील ससून रुग्णालयातून नांदेडकडे डेड बाॅडी घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झालाय. यात चार वाहनांचे मोठे नुकसान झालेय.रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे.या रुग्णवाहिकेत चालकासह सात प्रवासी होते सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्वजन पुणे येथील ससून हॉस्पिटल या ठिकाणाहून नांदेड या ठिकाणी MH 02 CE 9719 या क्रमांकाच्या ॲम्बुलन्स मधून डेड बॉडी घेऊन निघाले होते.
पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेले असताना इंदापूर तालुक्यातील काळेवाडी नंबर एक येथील पूलाजवळ रुग्णवाहिकेचा स्टेरिंग रोड तुटला गेला.त्यामुळे ती रस्ता ओलांडून सोलापूर पुणे लेन वर येऊन पलटी झाली. त्यामध्ये चार गाड्यांचे नुकसान झाले आहे.
What's Your Reaction?