दत्ता मामा आमदार नाही तर 'नामदार' झाले ! रविवारी इंदापूरात भव्य नागरी सत्कार सोहळा
आय मिरर
राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचा रविवारी २२ डिसेंबर रोजी इंदापूर शहरातील वाघ पॅलेस मध्ये भव्य नागरि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
2024 ची इंदापूर विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी झाली. दत्तात्रय भरणे यांनी 2014 साली प्रथम राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभूत केलं आणि भरणे विधानभवनात जाऊन पोहोचले.त्यानंतर 2019 ला ही भरणे यांनी विजयाची दौड कायम ठेवली.
त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत भरणे विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार की पाटील आपल्या पराभवाचा बदला घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होतं.मात्र या निवडणुकीत ही दत्तात्रय भरणे यांनी जवळपास 20 हजाराच्या मताधिक्यानं विजय प्राप्त केला आणि दत्तात्रय भरणे थेट कॅबिनेट मंत्री झाले.
नुकताच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यात दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ विधीनंतर लागलीच नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झालं. राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणे हे प्रथमच रविवारी 22 डिसेंबर रोजी इंदापूरला येत आहेत.
दत्तात्रय भरणे यांची कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्यानिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने भरणे यांचा जाहीर नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला असून दुपारी तीन वाजता इंदापूर शहरातील वाघ पॅलेस हा सोहळा पार पडणार आहे.
What's Your Reaction?