मांडवगण फराटा येथे चिमुकल्याचा ट्रकखाली सापडल्याने मृत्यू 

Jan 3, 2024 - 15:03
 0  531
मांडवगण फराटा येथे चिमुकल्याचा ट्रकखाली सापडल्याने मृत्यू 

आय मिरर(प्रमोल कुसेकर)

मांडवगण फराटा (ता. शिरूर)येथे ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने २ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१)रोजी दुपारी २ वाजता घडली.प्रज्वल देवराम माळी वय- २ वर्षे रा. गारमाळ, मांडवगण फराटा असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

देवीदास भगवान माळी वय ६८ वर्षे,सध्या रा. गारमाळ, मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे, मुळ रा. आवाड शिरपुरा ता.कळंब जि.धाराशिव यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी प्रशांत शिवाजी सुपेकर रा. यवत ता. दौंड जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास माळी हे गारमाळ येथे आपल्या कुटुंबासह राहतात.माळी यांचा मुलगा देवराम हा पत्नीसह सातारा येथे उसतोड मजुर म्हणुन काम काम करतो.देवराम यांची मुलगी स्नेहल व मुलगा प्रज्वल हे दोघेही आजोबाकडे राहत होते. देविदास हे पत्नी,नात व नातु यांच्यासह उमेश जगताप यांच्या शेतात कांद्याचे पीकाला पाणी देण्यासाठी गेले होते.गारमाळ येथील सचिन विठ्ठल चांदगुडे यांच्या गुऱ्हाळावर एम. एच. १४ ए.एच. ६८०८ हा ट्रक गुळ भरण्यासाठी आला होता.चालकाने ट्रक बंद करून रस्त्यावर लावला.स्नेहल व प्रज्वल हे दोघे ट्रक बंद असल्याने ट्रकच्या जवळच खेळत होते.यावेळी चालकाने अचानक ट्रक चालु करून पुढे घेतला.दोघांपैकी स्नेहल ही आवाज आल्याने एकटीच तेथुन बाजुला पळाली परंतु प्रज्वलला ट्रकचा धक्का लागल्याने तो खाली पडला.प्रज्वलचे डोके हे पुढील चाकाखाली आले.ट्रकचे पुढील चाक प्रज्वल याचे डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.

सदरचा अपघात हा ट्रकचालकाने ट्रक हा पुढे हयगईने, अविचाराने, रस्त्याचे आजुबाजुला न पाहता ट्रक चालवित पुढे घेवुन जात असताना प्रज्वल यास धक्का लागुन तो ट्रकचे पुढील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यु होण्यास कारणीभुत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow