महाराष्ट्राची हास्य जत्रा उद्या इंदापुरात, भरतशेठ मित्रपरिवाराच्या दहीहंडीला दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती 

Aug 17, 2025 - 09:22
Aug 17, 2025 - 09:24
 0  1203
महाराष्ट्राची हास्य जत्रा उद्या इंदापुरात, भरतशेठ मित्रपरिवाराच्या दहीहंडीला दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती 

आय मिरर 

पुण्याच्या इंदापुरात सोमवारी 18 ऑगस्ट सायंकाळी इंदापूर नगरीचे शेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवाला हास्य जत्रा फेम प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, नम्रता सांभेराव या सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे.या सोहळ्याला राजकीय,सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे.

तर खास करून प्रसिद्ध सिनेस्टार आणि नृत्यांगना मीरा जोशी यांचा बहारदार नृत्यविष्काराचे सादरीकरण केले जाणार असून सोमवार चा दिवस हा गोविंदांसाठी आणि इंदापूरकरांसाठी खास असणार आहे. 

मागील तीन वर्षापासून इंदापूर शहरात भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात हजारोंच्या संख्येने गोविंदा सहभागी होत असतात.

यंदा देखील मोठी तयारी करण्यात आली असून इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रारंगणात हा सोहळा पार पडणार आहे.

विशेष म्हणजे महिला भगिनींना या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे कर्मयोगी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा आणि शहा ग्लोबल स्कूलचे सर्वेसर्वा मुकुंद शहा यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow