राज्यात अतिवृष्टीने नुकसान हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Aug 17, 2025 - 10:10
Aug 17, 2025 - 10:13
 0  534
राज्यात अतिवृष्टीने नुकसान हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

आय मिरर 

गेल्या दोन दिवसापासून राज्यात धाराशिव वाशिम सोलापूर जळगाव यासह विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकाचं घराचं नुकसान झालं आहे. मात्र हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये दिली आहे.

रविवारी 17 जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील निरा नदी काठावर वसलेल्या दगडवाडी येथील श्री नंदिकेश्वर मंदिरात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते महापूजा अभिषेक पार पडलाय.श्री नंदिकेश्वराच्या यात्रेच्या निमित्ताने दत्तात्रय भरणे यांनी सपत्नीक दर्शन घेत विधिवत महापूजा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे दिवस येऊ दे. शेतकऱ्याच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळू दे असं साकडं भरणे यांनी श्री नंदकिशोर चरणी घातलं आहे.

दरम्यान भरणे म्हणाले की,काल धाराशिव मध्ये गेलो होतो अक्षरशा 165 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवसात झाला आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झालं आहे. ओढे नाले भरून वाहत आहेत. अनेक घरात पाणी गेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जनावरे वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. 

मी स्वतः काल धाराशिव मध्ये पाहणी दौरा केला. ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करा अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी मिळेल याची काळजी आम्ही घेत आहोत.

मुख्यमंत्री आणि दोन्ही व मुख्यमंत्री यांच्या आम्हाला सूचना आहेत राज्यात जिथे जिथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्या त्या ठिकाणी पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow