प्रस्थापितांना डावलून जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली याची जाण,शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मंत्री दत्तात्रय भरणे 

Aug 17, 2025 - 11:55
Aug 17, 2025 - 17:11
 0  432
प्रस्थापितांना डावलून जनतेने शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली याची जाण,शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार : मंत्री दत्तात्रय भरणे 

आय मिरर 

इंदापूर तालुक्यात पाच वर्ष रोज जरी उद्घाटन केली तरी कामे जास्त होतील एवढी काम इंदापूर तालुक्यात मी केलेली आहेत.काम केले मी जनतेवर उपकार केले नाहीत,प्रस्थापितांना डावलून या तालुक्यातील जनतेने मला एका शेतकऱ्याच्या मुलाला संधी दिली एवढं मोठं पद मला मिळालं याची मला जाण आहे. कृषी खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार अशी ग्वाही दत्तात्रय भरणे इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे दिली.

रविवारी 17 जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आज श्री नंदिकेश्वराला अभिषेक घालण्यात आला यानंतर भरणे उपस्थित यांना मार्गदर्शन करत होते.

मंत्री भरणे म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कृषी मंत्री पद मिळालं.या ठिकाणी नीरा नदीकाठी आपण पाच कोटी रुपये खर्चून संरक्षण भिंत बांधत आहे त्याचे भूमिपूजन आज झालं आहे. 2012 साली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर या भागात विकासाचा निधी दिला. त्यानंतर प्रत्यक्षेत्रात या परिसरात विकासाचा निधी देण्याचा प्रयत्न प्रमाणिकपणे केला.

एखाद्या कामाचा शो जाहिरात पुढे पुढे समोर मीडियासमोर जायचं हे मला पहिल्यासमोर आवडत नाही. कृषिमंत्री झाल्यामुळे थोडसं मला तिथं पकडलं जातंय.जबाबदारी मोठी आहे याची जाणीव आहे.शेतकऱ्याच्या अडचणी प्रश्न समस्या काय आहेत हे मला माहित आहेत. 

सकाळी उठल्यानंतर मला शेत दिसते झोपायला गेल्यानंतर शेत दिसतं. कुठले निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने घेण हिताच आहे. याचा विचार मी करत असतो. मी नंदकेश्वराची शपथ घेऊन सांगतो माझ्या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे जे चांगले निर्णय असतील तो घेण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे घेईल. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं राज्याच्या एवढ्या मोठ्या जे पद पहिल्या पाच पदांपैकी आहे. त्या पदा पर्यंत जाण्याचा योग मला मिळाला.

पूर्वी मी क्रीडा मंत्री होतो त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला जाता येत होतो भेटी देता येत होते पण आता मला समजून घ्या.मी सुखदुखात आलो नाही म्हणजे माझं प्रेम तुमच्यावर नाही असं नाही, पण माझ्यावर राज्यातील मोठी जबाबदारी आहे.एखाद्या कार्यक्रमात मी आलो काय ना आलो काय सुखदुःखात आलो काय न आलो काय तरी मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या. मी तुमच्या प्रत्येक सुखदुखात आहे. मला साथ द्या सहकार्य करा. महाराष्ट्रात इतर तालुक्यात गावात जाण्यासाठी मला पाठिंबा द्या. 

पूर्वी दगडवाडी परिसरात बंधारे रस्ते काय अवस्था होती.आज इथले नीरा नदीमधील बंधारे भरल्यानंतर मनाला समाधान वाटतं.आपण ज्या आयुष्यात काम करतो ते डोळ्याने पाहिलं तर समाधानाचं काम होत आहे.कधी कधी एखाद्या योजनेला उशीर होतो एखादी नवीन योजना लगेच होते याचा अर्थ आमचं लक्ष तुमच्यावर अजिबात लक्ष नाही असं नाही.दुसरा माणूस कुठलंही तुमचं काम करणार नाही येतील गप्पा मारतील मला कोणावर करायची नाही.

आपण आता आपण पुढे गेलो आहोत.टीका टिपणी न करता गावातील गरीब माणसाला सरकारच्या योजनांचा लाभ मिळेल हे पहा. कुठेही करून टोकाला जाऊ नका गावातील वाद भांडणे बाजूला ठेवा. असं म्हणत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांवर टीका केली.

भरणे पुढे म्हणाले की,माझं सर्वांवर प्रेम मी सर्वांचा ऐकणारा कार्यकर्ता.मी कानाला लागणाऱ्याचं पण तेवढेच ऐकतो आणि न लागणाऱ्याच पण तेवढंच ऐकतो.मोठे लोक येथील जातील तुमच्याकडून काम करून घेतील सुखात तुमच्या येतील दुःखामध्ये फक्त तुमचा मामाच तुमच्या सोबत आहे हे पण आयुष्यात लक्षात ठेवा.

मी पण माणूस आहे, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नाही टाकली तरी चालेल पण मार्गात काटे टाकू नका.विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे की मला शाब्बासकी देऊ नका पण माझ्या मार्गात काटे काचा टाकू नका मी कधी तुमच्यावर टीका टीपणी करणार नाही.या देवाला सुद्धाच कळतं कोण खरा आणि कोण खोट आहे.आपण जर नंदकिशोर समोर मनाने मस्तक टेकवलं तर तर तो सुद्धा आपल्याला पावतो याचं उत्तम उदाहरण मी आहे तुमच्यासमोर आहे. 

लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय...

माझ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती करतो की तुम्ही म्हणाल मामांचं आमच्याकडे लक्ष नाही,आरे लाडक्या बहिणींनो तुमच्यामुळेच मी इथं बोलतोय.लाडक्या बहिणीने आम्हाला सत्तेत सहभागी होण्यात तारल आहे. लाडक्या बहिणीसाठी अजूनही काही गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या करण्याचा भविष्यात प्रयत्न करूया असेही भरणे यांनी म्हटलं.

राज्यात पाऊस पाणी चांगला पडत आहे अजून चांगला पडू दे शेतातील पीक पाण्याचं उत्पादन चांगलं होऊ दे त्याला चांगला बाजारभाव मिळू दे हे आज मी नंदकेश्वराला साकडं घालतो.सकाळी सकाळी शेळगाव मध्ये गेलो होतो, बापूराव दुधाळ आणि त्यांचे बंधू यांच्या डाळिंब बागेत गेलो आज त्यांचं डाळिंब एक्सपोर्टला जात आहे.190 दर मिळत आहे.जर चांगलं कष्ट केलं तर दहा एकरात त्यांना तीन कोटी रुपये मिळाले.

दिवस उगवण्याच्या आत दुधाळ यांचं कुटुंब बागेत औषध फवारते, हे सोपं नाही त्यात तुम्हाला कष्ट करावे लागतील.अशा कुटुंबाची देखील यशोगाथा मी ऐकणार आहे, एखादा शेतकरी कष्ट करतोय पण त्याला यश येत नाही मी त्याच्याकडे पण जाणार आहे.राज्याचा कृषी मंत्री म्हणून काय मदत करता येईल सहकार्य करता येईल तो प्रयत्न मी करणार आहे.

टीका टिपणीचे दिवस राहिले नाहीत आपण त्याही पुढे गेलो... 

कोणावरही टीका टीपणी करण्याचे दिवस आता राहिले नाहीत आपण आता त्याही पुढे गेलो आहोत.राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप मोठी जबाबदारी दिली आहे, मला जेवढी मदत करता येईल तेवढी करीन. काही गोष्टींमध्ये मला तुम्ही समजून घ्या सांभाळून घ्या. येणाऱ्या काळात निश्चित प्रकारे अजूनही सर्वसामान्य माणसासाठी चांगल्या गोष्टी करता येतील ते करणार आहे.

क्रीडा आणि अल्पसंख्यांकच थोडं बरं होतं लय त्रास नव्हता...

काल मी मराठवाड्यात विदर्भात होतो आता मला थोडं फिरावे लागते पळावे लागतंय, क्रीडा आणि अल्पसंख्यांकच थोडं बरं होतं लय त्रास नव्हता पण आता त्रास तर घ्यावाच लागेल.त्रास म्हणता येत नाही आपल्यावर जबाबदारी आहे आपल्यावर विश्वास टाकलेली आहे. राज्यातील नेत्यांनी इंदापूर तालुक्यावर विश्वास टाकला आहे. इंदापूर तालुक्याचे नाव उज्वल व्हावं ही माझी अपेक्षा आहे.माझे काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे या जगात उद्या आपण असेल नसेल पण कोणीतरी म्हटलं पाहिजे या राज्याचा एक कृषिमंत्री होता.काल मी धाराशिव ला गेलो होतो त्या लोकांना एवढं बरं वाटलं की ते म्हणाले की आमच्या आयुष्यात कधी राज्याचा कृषिमंत्री आमच्या गावात बांधावर वाडी वस्तीवर येऊ शकतो. चांगलं समाधान वाटतं की आपण काम करतो फिरतो हे सांगायलाही भरणे विसरले नाहीत

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow