बिजवडी गणातून अमोल करे यांना उमेदवारी द्या ! करे समर्थकांची मागणी
आय मिरर
सध्या राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं असून कार्यकर्ते आता अंग झटकून मैदानात उतरलेत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गट असून कोणत्या जिल्हा परिषद गटात कोणाला उमेदवारी दिली जाणार हे जरी अद्याप वेगवेगळ्या राजकीय पक्षाने अधिकृत जाहीर केलं नसलं झालं नसलं तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र काही चेहऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेल आहे.
तर पंचायत समितीच्या निवडणुकांच्या बाबतीत ही इंदापूर मध्ये 16 पंचायत समिती गण आहेत आणि या वेगवेगळ्या गणांमधून इच्छुक असणारे विविध चेहरे आता तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करताहेत.
विशेष म्हणजे इंदापूर तालुक्यातील पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील बिजवडी गणामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे करेवाडी येथील कार्यकर्ते अमोल करे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समिती करिता उमेदवारी द्यावी अशी मागणी अमोल करे समर्थकांची असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अमोल करे यांच्या उमेदवारीबाबत विचार करणार का असाही प्रश्न आहे.
पंचायत समिती निवडणुकांकरिता बिजवडी गण हा ओबीसी करिता आरक्षित झाला आहे. याच गणात असणाऱ्या करेवाडी गावात पंचायत समिती करिता उमेदवारी द्यावी अशी अमोल करे यांच्या समर्थकांची मागणी आहे. अमोल करे यांचे बंधू रमेश ज्ञानदेव करे हे करेवाडी गावचे विद्यमान सरपंच आहेत. गेल्या वीस वर्षापासून रमेश कडे आणि अमोल करे हे दोघेही बंधू खंबीरपणे मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी उभाही राहिलेले आहेत.
करेवाडी गाव हे नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून नेहमीच या गावाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झुकते माप दिले आहे. त्यामुळे यावर्षी पंचायत समिती करता याच गावाला उमेदवारी द्यावी आणि ती निष्ठावंत विश्वासू कार्यकर्ते अमोल करे यांना उमेदवारी द्यावी अशी अमोल करे यांच्या समर्थकांची मागणी आहे.
गेल्या वीस वर्षापासून अमोल करे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी एकनिष्ठ असून गाव पातळीवर आणि आसपासच्या गावांमध्येही अमोल करे यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांनी नेहमीच पक्षासाठी झोकून देऊन काम केले असून निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी पक्षाने आता उभा राहण्याची गरज आहे. त्यामुळे आमच्या मागण्यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गांभीर्याने विचार करून आम्हाला या निवडणुकीत संधी देतील असा विश्वास ही अमोल करे यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय.
What's Your Reaction?